• Home
  • माझा जिल्हा
  • प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबत कार्यशाळेचे आयोजन
Image

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबत कार्यशाळेचे आयोजन

प्रतिनिधी

 प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत विविध प्रकल्प उभारण्याबाबत कृषि विभागाच्यावतीने ३ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता बारामती सहकारी दूध संघाच्या शरद सभागृह येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी संस्था, विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, सहकारी दुध संघ, कृषि उत्पन्न बाजार समिती, स्वयं सहाय्यता गट, फेडरेशन व आत्मा अंतर्गत शेतकरी गट यांना ३ कोटी रुपये पर्यंत अनुदान देण्यात येते. या कार्यशाळेत योजनेचा उद्देश, सामाईक पायाभूत सुविधा, मुल्य साखळी, प्रकल्पासाठी लागणारे कागदपत्रे व अनुदानाचे स्वरूप इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या कार्यशाळेस खासदार सुप्रिया सुळे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेस बारामती उपविभागातील सर्व शेतकरी उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी, शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक, विविध सहकारी संस्थांचे अध्यक्ष, सचिव, स्वयंसहाय्यता गट, फेडरेशनचे प्रतिनिधी, आत्मा अंतर्गत गटांचे गट प्रमुख यांनी उपस्थित राहवे, असे आवाहन उप विभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026