संपादक मधुकर बनसोडे.
सोमेश्वर नगर येथील मु.सा.काकडे महाविद्यालयामध्ये दिनांक 21 फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू झालेली आहे. मु.सा. काकडे महाविद्यालय शिस्तीच्या बाबतीत नेहमीच आघाडी वरती राहिलेले आहे
त्यातच प्राचार्य पदाची धुरा देविदास वायदंडे यांनी हाती घेतल्यापासून तर कॉलेजची एक वेगळीच ओळख निर्माण झालेली आहे कॉलेजला येणारा विद्यार्थी हा क्लासरूम मध्येच बसला पाहिजे अन्यथा कॉलेज कडून त्या विद्यार्थ्यावरती कारवाई केली जाते.
त्याचाच फायदा आज बारावीच्या परीक्षेला होत आहे या परीक्षा दरम्यान परीक्षेला बसण्या अगोदर येणाऱ्या विद्यार्थ्यांची तपासणी करून शिक्षक त्यांना परीक्षा हॉल मध्ये सोडतात
मु.सा.काकडे महाविद्यालयाच्या रुसा बिल्डिंगमध्ये बारावीची परीक्षा पार पडत आहे. रुसाची स्वतंत्रपणे बिल्डिंग आहे त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शांततेचे वातावरण मिळत आहे व त्यामुळे कॉलेजच्या नियमित कामकाजात देखील कोणतीही अडचण निर्माण होत नाही.
रुसा बिल्डिंगच्या बाहेर व मु.सा.काकडे महाविद्यालय परिसरामध्ये करंजे पूल पोलीस चौकी यांच्या माध्यमातून चोख पोलीस बंदोबस्त देखील यावेळी ठेवण्यात आलेला होता. बारावीची परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी मु.सा.काकडे महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे नेहमीच प्रयत्न असतात.
मु.सा. काकडे महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री सतीश काकडे यांनी देखील बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना. Mन्यूज मराठीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.