आसमानी संकटासह भुरट्या चोरांच्या संकटाने शेतकरी अडचणीत.

माझा जिल्हा

 संपादक.मधुकर बनसोडे.

 अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास मातीमोल होतोय की काय अशी भीती शेतकरी वर्गामधून व्यक्त होत आहे. गहू,हरभरा, कांदा,मका. अशा अनेक पिकांना या अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. एकीकडे आसमानी संकटामुळे शेतकऱ्याचं कंबरड मोडलेलं आहे तर दुसरीकडे परिसरातील भुरट्या चोरांमुळे शेतकऱ्याचा प्रपंचा देशोधडीला लागण्याची वेळ आलेली आहे. दहा पाच रुपयांसाठी किंवा मोजमजा करून नशा करण्यासाठी काही भुरटे चोर सोमेश्वर परिसरातील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटर. मोटरीची केबल वायर. यांची चोरी करून शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकत आहेत.

 करंजे परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींवरील मोटरांची केबल चोरी झाल्याची निदर्शनास येत आहे वेळीच पोलीस प्रशासनाने अशा भुरट्या चोरांच्या मुसक्या आवळून कायमस्वरूपाची आदल घडवावी अशी मागणी करंजे परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

 लवकरच यासंबंधी करंजे गावातील शेतकरी पोलीस स्टेशनला तक्रार देखील देणार आहे अशी माहिती शिवाजी शेंडकर यांनी दिली.