संपादक मधुकर बनसोडे.
वाघळवाडी गावातील स्मशानभूमी अनाधिकृतपणे पाटबंधारे विभागाच्या जागेमध्ये बांधून निधीचा गैरवापर केल्याचा आरोप दादू मांगडे यांनी केलेला आहे. तसेच मागील पाच वर्षांमध्ये ग्रामपंचायत वाघळवाडी मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे अशा आशियाचे निवेदन अनेक वेळा दादू मांगडे यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद या ठिकाणी दिलेले आहेत याची सखोल चौकशी करून संबंधितांवर ती कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून केली जात होती
मात्र निवेदन अर्ज देऊन सुद्धा प्रशासनातील अधिकारी कारवाई करत नाहीत हे लक्षात येताच दादू मांगडे यांनी आठ मार्चपासून प्रांत अधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे आज आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे मात्र प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची या उपोषणाची दखल घेतलेली दिसत नाही.
प्रशासनातील अधिकारी राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी पडलेले आहेत? त्यामुळे माझ्या उपोषणाची जाणीवपूर्वक दखल घेत नाहीत जाणीवपूर्वक माझ्या जीविताशी खेळत आहेत असे दादू मांगडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
उपोषण दरम्यान जर माझ्या जीवितास काही बरे वाईट झाले तर त्यासाठी पंचायत समिती अधिकारी वर्ग जबाबदार राहील असे देखील दादू मांगडे यांनी सांगितले.