जुबिलंट इन्ग्रेव्हिया लिमिटेड कंपनी निरा येथे समुदाय मेळावा संपन्न.

माझा जिल्हा

प्रतिनिधी.

 आज दिनांक 11/3/2023 रोजी सकाळी दहा वाजता जुबिलंट कंपनी यांच्या वतीने नीरा, नींबूत परिसरातील नागरिकांसाठी समुदाय मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. या समुदाय मेळाव्यामध्ये कंपनी व्यवस्थापनाकडून कंपनी माध्यमातून जे जे उपक्रम राबवले जातात विशेष करून शेतकऱ्यांसाठी तीन वर्षात 51000 फळझाडांचे वाटप सी एस आर च्या माध्यमातून देण्यात आली शेतकऱ्यांना नक्कीच याचा भविष्यात फायदा होईल असे मनोगत व्यक्त करताना ढगे साहेब यांनी सांगितले.

 कंपनीच्या माध्यमातून नींबूत परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी एलईडी टीव्ही चे वाटप करण्यात आले.

 याचबरोबर स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने कंपनीमध्ये जवळपास 95 टक्के कामगार हे स्थानिक असल्याचे देखील यावेळी कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

 प्रश्न विचारत असताना निंबुत व परिसरातील शेतकऱ्यांनी टोमॅटो ज्यूस कंपनी जुबिलंट कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात यावी याचा परिसरातील शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल अशी मागणी केली गेली.

 यावेळी प्रशासनाने या मागणीचा भविष्यात नक्कीच विचार करू असे शेतकऱ्यांना अस्वस्थ केले.

 या कार्यक्रमासाठी निरा ग्रामपंचायत सरपंच, तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश भाऊ काकडे, त्यांचे सर्व सदस्य मंडळ तसेच निंबुत गावातील सरपंच निर्मलाताई काळे, उपसरपंच अमर काकडे, त्यांचं सर्व सदस्य मंडळ, परिसरातील नागरिक, बचत गटातील महिला, मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच नीरा नींबूत सोमेश्वर परिसरातील पत्रकार बांधव देखील या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते.

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इसाक मुजावर यांनी केले.