बारामती! वडगाव निंबाळकर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त संत सावतामहाराज मंदिर मध्ये व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

माझा जिल्हा

वडगाव निं. प्रतिनिधी – फिरोज भालदार

वडगाव निंबाळकर येथे संत सावतामहाराज मंदिरात,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा 126 वा स्मुर्तिदिन साजरा करण्यात आला. मान्यवरांनी प्रतिमेचे पूजन केले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने माननीय श्री. संजय ऊर्फ संजुमामा टिळेकर , सत्यशोधक फेडरेशन समाज क्रांती व स्वराज्य क्रांती उद्योग समुह,यांनी माळी समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुण युवक व युवतीना तळमळीने मार्गदर्शन केले. समाजातील मतभेद बाजूला ठेवून सम विचारी माणसं एकत्रित येऊन व्यवसाय कसा सुरू करायचा,माल उत्पादन कसा करायचा, उत्पादन माल मार्केटिंग कसा करायचा,भागभांडवल राखून नफा कसा मिळवायचा, या विषयी सर्व मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमास संत सावतामाळी देवस्थान समितीचे मोलाचे योगदान लाभले.या कार्यक्रमप्रसंगी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक गणेश हिरवे यांनी केले. संतोष यादव पुणे जिल्हा सरचिटणीस समता परिषद यांनी आपले मनोगत व्यक्त केले. निलेश आगम यांनी या कार्यक्रमाला आलेल्या सर्वांच मनापासून आभार मानले.या कार्यक्रमासाठी उपस्थित, विनय चांगल स्वराज्य उद्योग समुह पार्टनर, हनुमंत बनकर, अतुल रासकर कार्यकारिणी सदस्य समता परिषद,बाळासाहेब शिंदे उपसरपंच करंजे, नारायण गिरमे, दत्तात्रय गिरमे, हेमंतनाना ढोले, दत्तात्रय बनकर,मुरलीधर हिरवे,सतीश लोणकर, दत्ता नेवसे, गणेश हिरवे, लालासो आगम,वडीलधारी मंडळी, माता – भगिनी,सर्व तरुण युवक-युवती वर्ग उपस्थित होते.