पीएमपीएल पुणे भेकराईनगर आगार कर्मचारी व प्रवाशांचे आरोग्य धोक्यात.?

सामाजिक

*प्रतिनिधी- विजय गायकवाड.*
पुणे येथील भेकराईनगर आगार या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी उंदरांचा सुळसुळाट झालेला आहे. व स्वच्छता नाही .तसेच कर्मचाऱ्यांना जेवणाच्या ठिकाणी स्वच्छता नाही. प्रवाशांना व कर्मचाऱ्यांना दुर्गंधीच्या वासाला सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याची टाकी ही वेळेवर स्वच्छ केली जात नाही. त्याच्या आसपास सर्वत्र दुर्गंधी व कचरा पसरलेले आहे.भेकराईनगर येथील आगाराचे याच्याकडे दुर्लक्ष आहे असे दिसत

आहे. पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांना त्याच ठिकाणी जेवण करावे लागत आहे .पिण्याचे पाणी तेच वापरावे लागत आहे. तसेच ते कर्मचाऱ्यांच्या व प्रवाशांच्या आरोग्याशी खेळत आहेत का?अशी प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची चर्चा होत असताना दिसत आहे. त्याच्यामुळे अनेक प्रकारचे आजार होण्याची शक्यता आहे. या गोष्टींमुळे कर्मचारी व प्रवाशांना होणाऱ्या आजारांना जबाबदार कोण? हा प्रश्न प्रवाशांना व कर्मचाऱ्यांना पडलेला आहे .याच्यावर काही उपाय योजना व दक्षता घेतली जाणार का ? का त्यांना या गोष्टींना असेच कायम सामोरे जावे लागणार का? असे प्रवाशांना कर्मचाऱ्यांना पडलेले प्रश्न आहेत.