बारामती तालुक्यातील अनेक गावांमध्ये, थंडी, ताप, सर्दी, खोकला, या आजाराने नागरिक त्रस्त, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष नागरिकांचा आरोप.

सामाजिक

संपादक- मधुकर बनसोडे

मागील दहा पंधरा दिवसांपासून बारामती तालुक्यातील अनेक गावांमध्ये सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी अशा आजाराने अनेक वय वृद्ध नागरिक लहान मुले त्रस्त आहेत मात्र आरोग्य विभागाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याची खंत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

 मागील काही दिवसांपूर्वी प्रशासनातील अधिकारी कर्मचारी संपावरती असल्यामुळे नागरिकावर लक्ष देण्यासाठी वेळ नव्हता मात्र आता संप मिटलेला आहे तरीसुद्धा आरोग्य विभागाकडून कोणत्याही प्रकारच्या तपासण्या अथवा सर्वे होताना दिसत नसल्याने नागरिकांनी यावरती तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे.

 आलेला ताप व खोकला लवकर जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे अनेक सरकारी दवाखान्यांमध्ये तपासण्यासाठी डॉक्टर उपलब्ध नसल्याचे देखील चित्र यावेळेस दिसून येत आहे.

 आरोग्य विभाग ॲक्शन मोड वरती येणार का? सामान्य नागरिकांना दिलासा देणार का? तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी चार दिवसापूर्वी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला असता लगेचच आशा वर्कर यांना सर्वे करायला सांगू असे आश्वासन देण्यात आले होते मात्र आरोग्य अधिकारी यांना देखील या गोष्टीचा विसर पडला की काय? असेच म्हणावे लागेल.

 सामान्य गोरगरीब नागरिकांची आरोग्य सुरक्षा ही रामभरोसेच आहे का?