• Home
  • माझा जिल्हा
  • धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश
Image

धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश

प्रतिनिधी

धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना पुणे जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये मोफत शिक्षण देण्यासाठी तीन शाळांची निवड करण्यात आली असून पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणात मागे पडू नये तसेच उच्च शिक्षणाच्या बदलत्या परिस्थितीशी त्यांना जुळवून घेणे शक्य व्हावे यासाठी त्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्यास राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण, निवास, भोजनाबरोबर इतर सोई-सुविधा शासनाकडून मोफत पुरविल्या जातात.

या योजनेंतर्गत शिक्षणासाठी पुणे जिल्ह्यातील जे. आर. गुंजाळ इंग्लिश मिडीयम स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज, आळेफाटा (ता. जुन्नर), एस. डी. सह्याद्री पब्लिक स्कूल (सीबीएसई) अॅण्ड ज्युनियर कॉलेज, वाघळवाडी (ता. बारामती) आणि एस. बी. पाटील पब्लिक स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, वनगळी (ता. इंदापूर) या तीन शाळांची निवड करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील धनगर समाजातील पालकांचे उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी आहे असे विद्यार्थी तसेच विधवा, घटस्फोटीत, निराधार, परित्यक्ता व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील विद्यार्थ्यांनी या शाळांमध्ये प्रवेश घेऊन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण पुणेच्या सहायक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026