• Home
  • सामाजिक
  • संत निरंकारी मिशनद्वारा आयोजित काळेवाडी पिंपरी येथे रक्तदान शिबिरामध्ये ३८३ श्रद्धाळूंनी केले रक्तदान…
Image

संत निरंकारी मिशनद्वारा आयोजित काळेवाडी पिंपरी येथे रक्तदान शिबिरामध्ये ३८३ श्रद्धाळूंनी केले रक्तदान…

प्रतिनिधी

            सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील ब्रांच काळेवाडी पिंपरी यांच्या वतीने संत निरंकारी मिशन ची सामाजिक शाखा, संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन २६ मार्च २०२३ रोजी संत निरंकारी सत्संग भवन, विजयनगर, काळेवाडी येथे करण्यात आले होते. ज्यामध्ये ३८३ श्रद्धाळू भक्तांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले, यामध्ये यशवंतराव चव्हाण रक्तपेढी यांनी १६३ युनिट, ससून रुग्णालय रक्तपेढी यांनी १०० युनिट, संत निरंकारी रक्तपेढी यांनी १२० युनिट रक्त संकलन केले.

            या शिबिराचे उदघाटन ताराचंद करमचंदानी (पुणे झोन प्रभारी) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. दरम्यान या रक्तदान शिबिराला अनेक सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

            संत निरंकारी मिशनद्वारे पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन दिल्ली येथे नोव्हेंबर १९८६ मध्ये संत निरंकारी समागमामध्ये करण्यात आले होते, ज्याचे उदघाटन बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी केले होते आणि ही मोहीम मिशनच्या अनुयायांद्वा रे मागील ३७ वर्षांपासून निरंतर अशीच चालू असून त्यात आतापर्यंत ७४७८ रक्तदान शिबीर संपन्न झाली असून १२,३३,१७८ युनिट रक्त संकलन करण्यात आले आहे. बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि ‘रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे.

            संत निरंकारी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी ,नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.

            रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादलचे क्षेत्रीय संचालक किशनलाल अडवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली, मिशन चे सेवादार,अनुयायी यांनी योगदान दिले तसेच आलेल्या सर्व रक्तदात्यांचे, मान्यवरांचे आभार गिरधारीलाल मतनानी (पिंपरी सेक्टर प्रमुख) यांनी केले.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनतर्फे पत्रकार दिनाच्या पत्रकारांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा.

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकार बांधवांचा…

ByBymnewsmarathi Jan 6, 2026

बारामती बिबट्या संदर्भातील चुकीच्या बातमीबाबत स्पष्टीकरण व जाहीर माफी.

आमच्या ‘एम न्यूज मराठी’ (M News Marathi) या न्यूज पोर्टलवर काल, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी बारामती परिसरात…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

भीमाशंकर मंदिर ३ महिने बंद ठेवण्याबाबत प्रशासकीय चर्चा; लवकरच होणार अंतिम निर्णय

प्रतिनिधी बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २८८.१७ कोटींचा विकास…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

गोमाता’ फक्त भाषणातच का? रस्त्यावर फेकल्या जाणाऱ्या वासरांच्या नशिबी मरणयातनाच!

सह संपादक- अक्षय थोरात ​ ​आपण गायीला ‘माता’ मानतो, तिची पूजा करतो. पण आज समाजातील एक भयाण वास्तव…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025