शिंगणापूरहून मागारी फिरलेल्या शिवभक्तान साठी थंड पाणी सरबत वाटप करण्यात आला . 

सामाजिक

 इंदापूर. प्रतिनिधी गजानन टिंगरे

वालचंदनगर येथे पर्यावरण व
प्रदूशण रक्षण संस्थेच्या ऊपक्रमाचा शिवभक्ताना चांगला लाभ झाला . शिंगणापूरची यात्रा ऊरकून परतणार्या कावडींच्या शिव भक्तांना थंड पाणी तसेच रसना सरबत वाटप करण्यात आला . याचा लाभ दिड ते दोनहजार लोकांनी घेतला .शिंगणापूरहून परतताना घराच्या ओढीने निघालेले रखरखत्या ऊन्हात ट्रँक्टर ,टेंपो ,टुव्हीलर ,खाजगी गाड्यांच्या रांगा लागतात .

वालचंदनगर मार्गाने नगर जिल्ह्यातील प्रवासी आसतात . शिवभक्तांनी थंड पाणी सरबत पिऊन समाधान व्यक्त केले . या ऊपक्रमाचे चौथे वर्षे आहे . संस्थेमार्फत झाडे लावा झाडे जगवा याचा संदेश देण्यात आला .


या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष योगेश कणसे संतोश सावंत , राजेंन्द्र क्षिरसागर , नितीन करगळ , राजेंन्द्र सुर्यवंशी , प्रकाश साळूंके , राहूल गायकवाड , रामभाऊ केंगर , शेखर मुळीक,करण आहीवळे ,जगंनाथ घोलप , यांनी सहभाग घेतला . या कार्यक्रमास गाईका राधा खुडे ,कांतीलाल गोसावी सरचिटणीस राट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या .