प्रतिनिधी.
भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त चंदूकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. व मिलिंद तरुण मंडळ निंबुत
यांच्यावतीने खेळ पैठणीचा म्हणजेच होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये असंख्य महिलांनी सहभाग नोंदवला. या
कार्यक्रमासाठी अनुक्रमे पहिल्या क्रमांकासाठी पैठणी साडी, दुतीय क्रमांकासाठी सोन्याची नथ, तृतीय क्रमांकासाठी फार्मिंग ठुशी ती बक्षीस ठेवण्यात आली होती.
त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रश्नमंजुषा घेऊन 12 विजेत्यांना देखील बक्षीस वितरण करण्यात आले.
पैठणीच्या मानकरी ठरल्या हर्षदा सुमित बनसोडे, तर द्वितीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या नीलम तुषार बनसोडे, तृतीय क्रमांकाच्या मानकरी श्रद्धा संजय गायकवाड, चतुर्थ क्रमांकाच्या मानकरी मोनिका संदेश गायकवाड, तर उत्तेजनार्थ बक्षीस कु. संपदा प्रसाद सोनवणे हिने पटकावले, या कार्यक्रमासाठी सचिन जाधव, सागर मदने, तात्यासाहेब धायगुडे, माने सर, जगताप सर, यांचे विशेष सहकार्य लाभले. तर निवेदक म्हणून नवनाथ कोलवडकर यांनी काम पाहिले.