वडगाव निं.प्रतिनिधी – फिरोज भालदार
भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांची १३२ वी जयंती वडगाव निंबाळकर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वडगाव निंबाळकर पंचशील मित्र मंडळ यांच्या वतीने प्रतिमेचे पूजन करण्यात आले . १५ एप्रील रोजी जयंती निमित्त भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यामध्ये सर्व ग्रामस्थ सहभागी होते . महिलांचा व लहान लहान मुलांचा देखील या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थिती होती .
कार्यक्रमाच्या मिरवणूक वेळेस भव्य असे आकर्षण केले होते. यामध्ये मिरवणुकीसाठी आकर्षित रथ आणला होता . या कार्यक्रमाच्या वेळेस वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे व सोमनाथ लांडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी वडगाव निं.पोलिस महेंद्र फणसे, वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत चे सरपंच सुनील ढोले , सदस्य पिंटू किर्वे , संजय साळवे, निलेश साळवे , तंटा मुक्ती अध्यक्ष माया साळवे ,जितेंद्र पवार ,निलेश मदने , सुनील माने , पै.नानासाहेब मदने , गणेश रांगोळे, अभिजीत साळवे, विशाल साळवे, आर्यन साळवे ,,विक्रम साळवे व ग्रामस्थ हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन वडगाव निंबाळकर पंचशील तरुण मंडळाने चांगल्या प्रकारे आयोजन करण्यात आले होते. याचप्रकारे हा कार्यक्रम चांगल्या रित्ते व शांततेत पार पडला .