• Home
  • सामाजिक
  • संत निरंकारी मिशनकडून मानव एकता दिनानिमित्त देशव्यापी रक्तदान अभियान संपन्न…
Image

संत निरंकारी मिशनकडून मानव एकता दिनानिमित्त देशव्यापी रक्तदान अभियान संपन्न…

प्रतिनिधी

देशभरात ५०,००० हून अधिक यूनिट रक्त संकलित, गंगाधाम पुणे येथे ११८० निरंकारी भक्तांनी केले रक्तदान

रक्तदानातून तयार होतात रक्ताची नाती – निरंकारी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज

गंगाधाम, पुणे २४ एप्रिल, २०२३ –
’रक्तदान हे केवळ एक सामाजिक कार्य नसून मानवीयतेचा असा एक दिव्य गुण आहे जो योगदानाची भावना दर्शवितो आणि त्यातून रक्ताची नाती निर्माण होतात’ असे उद्गार निरंकारी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी देशभर आयोजित रक्तदान श्रृंखलेच्या पार्श्वभूमीवर ग्राउंड नं. २, निरंकारी चौक, दिल्ली येथे आयोजित केलेल्या ‘मानव एकता दिवस’ समारोहाच्या वेळी विशाल जनसमूदायाला संबोधित करताना व्यक्त केले.


संत निरंकारी मंडळाचे पुणे झोन चे प्रमुख आदरणीय ताराचंद करमचंदानी जी यांनी या देशव्यापी रक्तदान अभियानाची माहिती देताना सांगितले, की संत निरंकारी सत्संग भवन, गंगाधाम, पुणे येथे ११८० यूनिट तर संपूर्ण भारतवर्षामध्ये ५०००० हून अधिक रक्त संकलित करण्यात आले.


सदगुरु माताजींनी मानव परिवाराला संबोधित करताना सांगितले, की रक्तदान हे निष्काम सेवेची अशी एक सुंदर भावना असते ज्यामध्ये सकळीकांच्या भल्याची कामना निहित असते. त्यामध्ये अशी भावना उत्पन्न होत नाही, की केवळ आपले सगे-सोयरे किंवा आपले कुटुंबच महत्वपूर्ण आहे, तर अवघे विश्वच आपला परिवार बनून जाते.
निरंकारी जगतामध्ये ‘मानव एकता दिवस’ युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांच्या प्रेरणादायी शिकवणूकीला समर्पित आहे. त्याबरोबरच सेवेचे पुंज, पूर्ण समर्पित गुरुभक्त चाचा प्रतापसिंह व अन्य महान बलिदानी संतांचेही या दिवशी स्मरण केले जाते. ‘मानव एकता दिवस’ या दिवशी संपूर्ण देशामध्ये जागोजागी सत्संग समारोह आणि विशाल रूपात रक्तदान शिबिरांच्या श्रृंखलेचे आयोजन केले जाते. त्यानंतर रक्तदान शिबिरांची ही श्रृंखला वर्षभर चालू राहते.


रक्तदानाचे महत्व समजावताना सदगुरु माताजींनी म्हटले, की ‘रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नव्हे. रक्त देताना ते कोणत्या शरीरामध्ये जाईल याचा आपण विचार करत नाही. हे तर एक मानवी मूल्यांचे दर्शन घडविणारे सामाजिक कार्य आहे. निरंकारी राजपिता रमितजी यांनी स्वत: रक्तदान करुन याचे प्रत्यक्ष उदाहरण प्रस्तुत केले.
या रक्तदान शिबिराला सुनील शिंदे (आयकर विभाग), माधुरी मिसाळ (मा. आमदार), स्मारथना पाटील (पोलीस उपायुक्त), सुनील भाऊ कांबळे (मा. आमदार) तसेच विभागातील नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांनी आपली उपस्थिती दर्शिवली. या रक्तदान शिबिरामध्ये वाय.सी.एम रुग्णालय रक्तपेढी यांनी ५५० युनिट, ससून रुग्णालय रक्तपेढी यांनी ६३० युनिट रक्त संकलन केले.

Releated Posts

रक्तदान करुन वाढदिवस साजरा व पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली

कोरोना काळात व जम्मु-काश्मिर येथे आयोजित सिंदूर महारक्तदान शिबिरात आरोग्यदुत श्री.कृष्णमुर्ती जगताप यांचा सक्रिय सहभाग बारामती – वैद्यकिय,सामाजिक,…

ByBymnewsmarathi Feb 14, 2026

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनतर्फे पत्रकार दिनाच्या पत्रकारांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा.

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकार बांधवांचा…

ByBymnewsmarathi Jan 6, 2026

बारामती बिबट्या संदर्भातील चुकीच्या बातमीबाबत स्पष्टीकरण व जाहीर माफी.

आमच्या ‘एम न्यूज मराठी’ (M News Marathi) या न्यूज पोर्टलवर काल, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी बारामती परिसरात…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

भीमाशंकर मंदिर ३ महिने बंद ठेवण्याबाबत प्रशासकीय चर्चा; लवकरच होणार अंतिम निर्णय

प्रतिनिधी बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २८८.१७ कोटींचा विकास…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025