प्रतिनिधी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे संत जनाबाई मागासवर्गीय मुलींचे शासकिय वसतिगृह येरवडा पुणे येथे सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती संत जनाबाई मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांनी दिली आहे.
संत जनाबाई मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात १०० मागासवर्गीय मुलींना इत्ता अकरावी, बारावी व डिप्लोमा पर्यंतच्या वर्गाना मोफत प्रवेश देण्यात येतो. त्याचबरोबर दरमहा ८०० रुपये निर्वाहभत्ता, १०० रुपये स्वच्छतेसाठी दिले जातात. स्टेशनरीसाठी ४ हजार रुपये प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी दिले जातात. सहल, गणवेश, ॲप्रण व प्रोजेक्टसाठीही नियमानुसार साहित्य पुरविण्यात येते.
या वसतिगृहात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थीनींनी तहसिलदारांचा मागील वर्षाचा उत्पनाचा दाखला, मागील वर्षाचे गुणप्रत्रक, जातीचा दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे सादर करावीत.
इच्छुक विद्यार्थीनींनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे (दूरध्वनी क्रमांक ०२०-२९७०६६११) अथवा गृहपाल, संत जनाबाई मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येरवडा पुणे (भ्रमणध्वनी क्रमांक ९५६१५६८४५९) येथे संपर्क साधावा, असे आवाहन संत जनाबाई मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.