• Home
  • माझा जिल्हा
  • निवृत्तीवेतनधारकांना आयकर कपातीबाबतचा विकल्प भरून देण्याचे आवाहन
Image

निवृत्तीवेतनधारकांना आयकर कपातीबाबतचा विकल्प भरून देण्याचे आवाहन

प्रतिनिधी

निवृत्तीवेतनधारकांना आयकर कपात जुन्या कर प्रणालीनुसार करावयाची असल्यास याबाबतचा विकल्प २५ मे २०२३ पर्यंत सादर करावा, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी पुणे यांनी केले आहे.

शासनामार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या पुणे शहर व जिल्ह्यातील वार्षिक निवृत्तीवेतन रुपये ७ लाख ५० हजार पेक्षा जास्त असलेल्या सर्व आयकरपात्र निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतनातून आयकर नियमान्वये दरवर्षी व दरमहा आयकर कपात करण्यात येते. सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षापासून आयकर विभागाकडून आयकर नियमात बदल झाले असून दोन पद्धतीने आयकर कपात करण्याबाबत आदेश दिलेले आहेत. वित्तीय वर्ष २०२३-२४ मध्ये जुनी कर प्रणाली स्वीकारण्यामध्ये आयकर स्लॅबमध्ये बदल झाले असून जर जुन्या कर प्रणाली नुसार आयकर गणना करावयाची असल्यास निवृत्तीवेतनधारकांनी जिल्हा कोषागार कार्यालय, पुणे येथे विकल्प भरून देणे आवश्यक आहे.

आयकर पात्र निवृत्तीवेतनधारकांना आपला आयकर कपात जुन्या कर प्रणालीनुसार करावयाचा असल्यास याबाबतचा विकल्प २५ मे पर्यंत सादर करावा. विहित मुदतीत विकल्प सादर न केल्यास त्याचा २०२३-२०२४ करीता नवीन कर प्रणालीनुसार आयकर कपात करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे कोषागार कार्यालय पुणेतर्फे कळविण्यात आले आहे.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026