भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रीडम स्टोरी धुळे जिल्हा समिती आयोजित महास्पर्धा

माझा जिल्हा

प्रतिनिधी

     भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रीडम स्टोरी धुळे जिल्हा समितीच्या वतीने एप्रिल २०२३ या महिन्यात महास्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या, ज्यात एकूण पाच विशेष स्पर्धा या दर रविवारी झाल्या होत्या. या सर्व स्पर्धेत अनेक साहित्यिकांनी सहभाग घेत पुरस्कार व सन्मानपत्र मिळवले आहेत. सदर महास्पर्धेचे संपूर्ण नियोजन हे धुळे जिल्हाध्यक्ष.सौ. वैशाली बोरसे व उपजिल्हाध्यक्ष.श्री. सचिन राजपूत,उ. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सौ. श्वेता देशपांडे यांनी केले व त्यांना या स्पर्धेसाठी धुळे जिल्हा समितीतील पदाधिकारी सौ.सीमा सूर्यवंशी,सौ.विजया भट व श्री.राजेश सोनार यांचे मोलाचे सहकार्य मिळाले तसेच संस्थापक अध्यक्ष. श्री. विशाल सिरसट , संस्थापक उपाध्यक्ष. श्री. विजय जायभाये, कार्याध्यक्ष. सौ. शिल्पा मुसळे, व मुख्य समितीचे सर्व पदाधिकारी यांचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. सर्व पाच स्पर्धेचे परिक्षक हे महाराष्ट्रातील नावाजलेले पाच वेगळ्या साहित्यिकांनी केले होते. स्पर्धेची संपूर्ण तपशील हे पुढीलप्रमाणे-

स्पर्धा क्रमांक:- १, दिनांक:- ०२/०४/२०२३ या स्पर्धेचा विषय हे होते व या स्पर्धेचे परीक्षण मा.वैशाली मॅडम बोरसे (जिल्हाध्यक्षा,धुळे) यांनी केले. या पहिल्या स्पर्धेचे निकाल पुढील प्रमाणे:- सर्वोत्कृष्ट : सचिन पाटील, उत्कृष्ट : सुभद्रासुत आंधळे व विद्या प्रधान, प्रथम: विनायक कृष्णराव पाटील, सुनंदा सुरेश अमृतकर, सुनंदा साळुंखे, द्वितीय : ॲड.अक्षशिला शिंदे, संगीता वाईकर, डॉ.रेखा पौडवाल, तर तृतीय : स्मिता वि.सावंत, विजया भट, वीणा पाटील यांनी मानाचे स्थान मिळवले.

स्पर्धा क्रमांक – २, दिनांक. ०९/०४/ २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचे विषय हे होते व या स्पर्धेसे परिक्षण हे अहमदनगरच्या मा. वैशाली पडवळ (संस्थेच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षा व अमरावती/मुंबई प्रदेश, कार्याध्यक्षा यांनी केले. या स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे:- सर्वोत्कृष्ट : विनायक कृष्णराव पाटील, उत्कृष्ट : जयद्रथ आखाडे, प्रथम : वृषाली टाकळे, द्वितीय : विद्या प्रधान तर तृतीय : सुवर्णा पवार यांनी मानाचे स्थान मिळवले.

स्पर्धा क्रमांक.३, दिनांक. १६/०४/२०२३ या स्पर्धेचे विषय सध्याच्या काळातील माणुसकी हे होते आणि या स्पर्धेसाठी परिक्षण, मा. रामेश्वर महाराज हिवाळे पाटील सर (शिक्षक, कीर्तनकार, सहसंपादक, विनोदी चारोळी व कवि,संचालक महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ बुलडाणा जिल्हा) यांनी केलं. या स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे:- सर्वोत्कृष्ट : सचिन पाटील, उत्कृष्ट : ॲड.अक्षशिला शिंदे, प्रथम : विणा पाटील, द्वितीय : डॉ. रेखा पौडवाल तर तृतीय गटात विनायक कृष्णराव पाटील यांनी मानाचे स्थान मिळवले.

स्पर्धा क्रमांक.४, दिनांक. २३/०४/२०२३ या स्पर्धेचे विषय खेळ नशिबाचा हे होते आणि या स्पर्धेसाठी परीक्षण वर्षा दिपक वराडे (राष्ट्रीय साहित्य लेखणी मंच तथा सामाजिक संघटना भारत – मुंबई प्रदेश अध्यक्ष तसेच जिल्हाध्यक्षा, आंतरराष्ट्रीय पर्यावरण आणि बहु उद्देशिय संस्था) यांनी केले, या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट : सचिन पाटील, उत्कृष्ट : रेखा पौडवाल, प्रथम : विजया भट, द्वितीय : महादेव भोकरे तर तृतीय : संगीता वाईकर यांनी मानाचे स्थान मिळवले.

स्पर्धा क्रमांक.५, दिनांक. ३०/०४/२०२३ या स्पर्धेचे विषय मनाचं अस्तित्व हे होते आणि या स्पर्धेसाठी परीक्षण सचिन राजपूत (उपाध्यक्ष,धुळे जिल्हा )यांनी केले, या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट : रमेश चव्हाण, उत्कृष्ट : श्रीकांत औटी, प्रथम : प्रतिमा कावळे व विनायक पाटील, द्वितीय : अक्षशिला शिंदे,सुवर्णा पवार व महेंद्र वानखेडे तर तृतीय : दत्ता देशमुख, विजया भट, सुवर्णा मालपुरे, दिलीप महाजन आणि संगीता वाईकर यांनी मानाचे स्थान मिळवले.

विशेष राज्यस्तरीय पुरस्कारासाठी काही नियम होते त्यावरून धुळे जिल्हा समितीने विशेष पुरस्कारासाठी नियमानुसार खालीलप्रमाणे मानकरी असलेल्या साहित्यिकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विशेष पुरस्कार यादी  

 साहित्य सम्राट – विनायक पाटील, 

  साहित्य भूषण – अक्षशीला शिंदे, संगिता वाईकर , विजया भट ,सचिन पाटील,

  साहित्य रत्न – विद्या प्रधान वीणा पाटील