परळी / प्रतिनिधी
परळीतील सर्व पञकारांच्या हस्ते 3D 360°(AC Dome Theatre) शोचे उत्साहात उद्घाटन संपन्न
सर्व पञकारांच्या शुभहस्ते परळी येथील औद्योगिक वसाहत येथे आज दि. 6 मे रोजी सकाळी 3D 360°(AC Dome Theatre) शो चे भव्य उद्घाटन करण्यात आले.
परळीत पहिल्यांदाच विज्ञानाचा अविष्कार तारे जमीन पे…याप्रमाणे विद्यार्थी तसेच पालकांसाठी या 3D शो चे दि6 मे व 7 मे असे दोन दिवस आयोजन करण्यात आले आहे.
या माध्यमातून मुलांचा बौद्धिक सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आकाशातील विविध ग्रहांचा अभ्यास तसेच सूर्य, चंद्र,तारे ,पृथ्वी तथा पृथ्वीवर डायनासोरचे अस्तित्व पृथ्वीची निर्मिती विविध घडत गेलेले बदल आणि आत्ताची पृथ्वी याबाबत सखोल ज्ञान यातून प्राप्त व्हावे म्हणून राजस्थानीज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री.चंदुलालजी बियाणी सचिव श्री.बद्रीनारायणजी बाहेती यांनी या थ्रीडी शोचे आयोजन केले आहे.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार संपादक शिवशंकर झाडे, परभणीचे माजी अधिकारी शिवाजीराव गमे, सतीश बियाणी, आत्मलिंग शेटे, प्रकाश चव्हाण, लक्ष्मण वाकडे , ज्ञानोबा सुरवसे ,धनंजय आढाव, दत्ता काळे, सुकेशनी नाईकवाडे, प्रा.पवन फुटके,महादेव शिंदे,धनंजय आरबुणे,ओम प्रकाश बुरांडे, मोहन व्हावळे, महादेव गीते, चंद्रप्रकाश काबरा नरसिंग अनलदास, जगदीश शिंदे, स्वानंद पाटील, कैलास डुमणे, प्रा. दशरथ रोडे, नितीन ढाकणे, अमोल सूर्यवंशी, श्रीराम लांडगे महादेव गीते, या उपस्थित सर्व पत्रकारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
विविध उपक्रमाद्वारे राजस्थानीज पोदार स्कूल हे ग्रामीण भागातही ज्ञानाचे दरवाजे विद्यार्थ्यांसाठी खुले करत आहे याबाबत अनेक पत्रकारांनी प्रतिक्रिया देवून शुभेच्छा दिल्या.
यावेळी शाळेचे अध्यक्ष श्री.चंदूलाल बियाणी, सचीव श्री.बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी , सहसचिव श्री.धीरज बाहेती ,अकॅडमीक डायरेक्टर श्री.बी.पी.सिंग, बचपन क्युरियस कीड्सच्या प्राचार्या सौ. दीपा बाहेती,प्राचार्य श्री. मंगेश काशीद , उपप्राचार्य श्री.लक्ष्मण पाटील यावेळी उपस्थित होते राजस्थानी पोदार लर्न स्कूल शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.