गारपीटचा फटका बसलेल्या बेशुद्ध व मरणासन्न बगळ्याला शर्थीचे प्रयत्न करून डॉ.संतोष पाटील यांनी दिले जीवदान.. मानवी वैद्यकीय ज्ञानाचा मिशन भरारी साठी उपयोग..

सामाजिक

गारपीटचा फटका बसलेल्या बेशुद्ध व म

सोयगाव दि.07 (दिलीप शिंदे सोयगाव) सिल्लोड- शहरातील स्नेहनगरच्या पाठीमागील शेता जवळ सकाळी एक बेशुद्ध व मरणासन्न अवस्थेत असलेला बगळा शे. अजहर नामक व्यक्तीला आढळला. सिल्लोड येथील प्रसिद्ध डॉक्टर संतोष पाटील यांनी नागास जीवदान दिल्याची बातमी वाचली होती.त्या अनुषंगाने त्यांनी डॉ पाटील यांचेकडे क्षणाचाही विलंब न लावता आणून दिला.पाटील यांनी सूक्ष्म निरीक्षण केल्यावर असे आढळले की त्यास डोक्याला उजवीकडे व उजव्या खांद्यावर गारपीट किंवा दगड यांचा फटका बसला आहे व त्या जखमेला व पूर्ण अंगावर मुंग्या लागल्या होत्या, तसेच त्याने पूर्ण मान टाकलेली होती व पायाचे स्नायूं पूर्ण आखडले होते.शरीराचे तापमान 15 सेल्सिएस इतके होते जे 35 ते 40 सेल्सिअस हवे होते .म्हणजे तीन पावसात पडून असल्याने व गारवा ,गारपीट मुळे हायपो थर्मीया झालं होतो व मसल स्टीफनेस ही आढळला होत्या व त्या दृष्टीने पटापट जखम स्वच्छ करून पूर्ण शारीरावरील मुंग्या काढून जखम स्वछ करून त्यावर रक्त स्त्राव थांबवून अँटी बायोटिक कोटिंग करण्यात आले.आखडलेले स्नायू साठी इन्फ्रा रेड लाइट ने रेडिएशन,शेक देऊन पायांची हालचाल व्यवस्थित करण्यात आली.इन्फ्रारेड किरणांनी उबदार पणा येऊन शारीरिक तापमान ही योग्य ठेवण्यात आलं.स्नायू मध्ये बळ यावे म्हणून कॅल्शियम ची मात्र ही देण्यात आली.वेळोवेळी रूम टेम्प्रेचर मेंटेन असलेले पाणी सुरुवातीला ड्रॉपरने नन्तर शुद्धीवर आलेवर स्वता ग्लासतील पाणी बगळ्याने पिऊन सर्वांच्या जीवात जीव आला.मासेचे बारीक तुकडे पाण्यात टाकून या वन्यजीवाने मस्त फस्त ही केले.8 तास विविध उपचार वेळोवेळी यावर सुरू होते.अखेर box मध्ये त्याच्या जोरात हालचाली वाढल्याने त्यास नैसर्गिक अधिवास लाभाचा व उडू शकतो का म्हणून रजाळवाडी तलावात पाण्यात सोडण्यात आले असता.त्याने तलावातील पाणी ही गटागटा पिले.थोडा थोडा तो चालत ही असून ,त्यास आता तलावाजवळ अजून,2 ते 3 दिवस ठेवावे लागेल असे डॉ पाटील यांनी सांगितले.
————-–——————————————————-
मिशन भरारी—वाचविण्यात यश आलेला हा पक्षी *ब्लॅक बिल एर्गेट* हा बगळा चा प्रकार असून मादी जातीचा असून स्त्रीत्व हे विपरीत परिस्थितीत सहज हार मानत नाही हे निसर्गातील सत्य आहे. पूर्ण वाढ झालेली आहे.उजवा पंख व डोक्यावर त्यास मार लागल्याने मेंदू चे नियंत्रण हरवल्याने पायाचे पेरोनस लोंगस हे स्नायू आखडले होते.त्यासाठी शेक ,मसाज व इतर उपाय एक मिनिट ही उसंत न घेता करण्यात आले.पक्षी आणून देणारे बंधु व मला या कामी मदत करणारे विनोद माळी,शुभम आरके,गणेश पारवे,रामू घोडके यांनी मौलिक साथ दिली म्हणून मी मिशन भरारी राबवू शकलो.-डॉ.संतोष पाटील,जैवविविधता संवर्धक,अभिनव प्रतिष्ठान,सिल्लोड