जुबिलंट कंपनीच्या खत प्रकल्पामुळे निंबुत येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात?

सामाजिक

 संपादक मधुकर बनसोडे.

 निरा निंबुत सीमेवरती असलेली जुबिलंट कंपनी या कंपनीचा नींबूत नजीक ( लक्ष्मी नगर ) येथे खत प्रकल्प आहे या खत प्रकल्पामध्ये उसाच्या रॉ मटेरियल पासून खत तयार केले जाते.

 मात्र उसाच्या गोडीमुळे या खत प्रकल्पामध्ये सदैव मच्छर, माशा, असे अनेक कीटक त्या ठिकाणी असतात व या मच्छर, माशांमुळे नींबूत व नींबूत परिसरातील नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.

 खत प्रकल्पामुळे झालेल्या माशा व मच्छर याचा व्हिडिओ आवर्जून पहा ⬇️⬇️

 लक्ष्मी नगर या परिसरामध्ये सर्वसामान्य नागरिक वास्तव्यास आहेत लक्ष्मी नगर पासून अगदी काही फुटाच्या अंतरावर ती हा खत प्रकल्प आहे त्या खत प्रकल्पामुळे तेथील नागरिकांचे आरोग्य आज धोक्यात आलेली आहे. खरंतर मानवी वस्तीमध्ये असा खत प्रकल्प उभा करता येतो का? हा एक सामान्य नागरिकाला पडलेला प्रश्नच आहे या कंपनीच्या विरोधात अनेक वेळा उपोषण झाली मात्र कंपनी प्रशासनावरती कोणताही त्याचा परिणाम झालेला नाही.

 जुबिलंट ही कंपनी म्हणजे परिसरातील नागरिकांच्या जीवनावरती कायम टांगती तलवारच असे देखील नागरिकांमधून बोलले जात आहे.

 खरंतर जुबिलंट कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला त्या ठिकाणी फॉगिंग केले पाहिजे मात्र कंपनी प्रशासन आम्ही फॉगिंग करीत आहोत असे सांगत आहे तर स्थानिक नागरिक कंपनी कोणत्याही प्रकारचे फॉगिंग करत नाही असे सांगत आहे सत्य नेमकं काय आहे.

 स्थानिक नागरिकांशी ज्यावेळी आम्ही चर्चा केली त्यावेळी स्थानिक नागरिकांच्या चर्चेमधून असे सांगण्यात आले की ज्यांचे नातेवाईक कंपनी मध्ये कामाला आहेत अशा लोकांच्या सह्या घेऊन कंपनी फॉगिंग केल्याचा दावा करत आहे? मात्र प्रत्यक्षात जुबलेंट कंपनी कडून फॉगिंग केले जात नाही?

 निंबूत व परिसरामध्ये जवळपास डेंगू चिकनगुनिया मलेरिया या आजाराने ग्रस्त असलेले रुग्णांची संख्या 50 च्या आसपास असण्याची शक्यता नाकारता येत नाही या सर्व रुग्णांचा खर्च कंपनी प्रशासनाने करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.

 याच खत प्रकल्पामुळे निरा बारामती रोड वरती मळी सांडल्यामुळे दरवर्षी पावसाळा सुरू होण्याच्या वेळेस अपघात घडत असतात कंपनी प्रशासनास सूचना देऊन सुद्धा कंपनी प्रशासन गांभीर्याने या गोष्टीची दखल घेत नसल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.

 जुबिलंट कंपनीचा मुजोरपणा आणखीन किती दिवस नागरिकांना सहन करावा लागणार. कंपनीच्या अधिकारी वर्गास यासंबंधी काही विचारणा केली असता संबंधित अधिकारी हे नेहमीच उडवा उडवीची उत्तर देत असतात.

 वर्षातून एकदा सेमिनार घेऊन निरा व नींबूत तेथील ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांना बोलावून आश्वासन देऊन खुश केले जाते.

 खरंतर निरा ग्रामपंचायत व निंबूत ग्रामपंचायत यांनी ठाम भूमिका घेऊन या कंपनीच्या विरोधात कारवाई करणे गरजेचे आहे अशी देखील चर्चा स्थानिक नागरिकांमधून होत आहे.

 या कंपनीच्या विरोधात प्रदूषणासंदर्भात देखील अनेक जणांनी संबंधित विभागाकडे तक्रारी दाखल केलेल्या आहेत. तरीही या कंपनीवरती कारवाई होत नसल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमधून होत आहे.

 का होत नाही कंपनी वरती कारवाई कोणाचा आहे वर्धास्त. लवकरच आणणार जनतेच्या समोर.