• Home
  • इतर
  • नागपूर पुणे प्रवास आठ तासात करणे शक्य : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी
Image

नागपूर पुणे प्रवास आठ तासात करणे शक्य : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी

प्रतिनिधी

नागपूर ते पुणे हा प्रवास आठ तासात करणे शक्य होईल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

सध्या नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची होणारी गैरसोय बघता नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग हा नव्याने प्रस्तावित असलेल्या पुणे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पुणे-औरंगाबाद या अॅक्सेस कंट्रोल ग्रीन एक्सप्रेस मार्गाला छत्रपती संभाजीनगर जवळ जोडता येईल, असे गडकरी यांनी आपल्या ट्विट संदेशांच्या मालिकेत म्हटले आहे.

हा रस्ता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी संपूर्णपणे नव्याने सहाय्य करून बांधण्यात येईल असेही त्यांनी म्हटले आहे.

यामुळे समृद्धी महामार्गावरुन पुणे ते छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद पर्यंत दोन अडीच तासात आणि नागपूर ते छत्रपती संभाजी नगर म्हणजेच औरंगाबाद हा साडेपाच तासांचा प्रवास प्रत्यक्षात करणे शक्य होईल, असे गडकरी म्हणाले.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025