• Home
  • माझा जिल्हा
  • महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा २४ तास उपलब्ध
Image

महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा २४ तास उपलब्ध

प्रतिनिधी

समाजमाध्यमातील अफवांवर विश्वास न ठेवण्याचे कृषि विभागाचे आवाहन

महा-डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याची सुविधा २४ तास उपलब्ध असून समाजमाध्यमातून पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

 महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरण्याची व सोडतीची मुदत १५ मेपर्यंत असल्याचे तसेच १५ मे नंतर जवळपास २ ते ३ महिने ऑनलाइन शेतकरी निवड सोडत होणार नाही, अशा आशयाचे संदेश आणि माहिती अज्ञातामार्फत विविध सामाज माध्यमांवर पसरविण्यात येत आहे.

महाडीबीटी पोर्टल संदर्भात अशाप्रकारचा कोणताही संदेश आणि माहिती कृषि विभागामार्फत देण्यात आलेली नाही, या संगणकीय ऑनलाईन प्रणालीवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याची सुविधा २४ तास उपलब्ध असून अर्ज केलेल्या घटकांची सोडत शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जानुसार व आवश्यकतेनुसार दर आठवड्याला काढण्यात येत आहे, असे कृषि विभागाने कळवले आहे.

शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/ या पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली जाऊन विविध लाभाच्या घटकांसाठी अर्ज करावेत, असेही आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026