संपादक मधुकर बनसोडे.
सध्या टोमॅटो पिकाला60/80₹ बाजार भाव मिळत आहे प्रति कॅरेट 25 किलो. तोडणी वाहतूक मजुरी याचा विचार केला तर शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातले पैसे टाकून मजुरांना पैसे द्यावे लागत आहेत गेल्या वर्षी याच दिवसांमध्ये प्रति कॅरेट 25 किलो टोमॅटोचे दर बाराशे ते चौदाशे रुपये राहिले होते. मात्र यावर्षी टोमॅटोला बाजार भाव नसल्यामुळे टोमॅटो तोडून शेतात टाकून देण्याची वेळ शेतकऱ्यावरती येऊन ठेपलेली आहे.
कर्नाटक, आंध्रा, केरळ, गोवा, या राज्यातून दरवर्षी टोमॅटो खरेदी करण्यासाठी व्यापारी पश्चिम महाराष्ट्रात येत असतात मात्र प्रत्येक राज्यात टोमॅटोचे उत्पादन अधिकचे झाल्यामुळे शेतकऱ्यावरती टोमॅटोचा लाल चिखल करण्याची वेळ आलेली आहे. एक एकर टोमॅटो करण्यासाठी.
रोप, तार, काठी, सुतळी, लेबर, तुमचा खर्च काढला तर एकरी किमान एक लाख ते दीड लाख रुपये खर्च येत असतो मात्र यावर्षी खर्च देखील निघणे अवघड झाली आहे त्यामुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल होऊन आर्थिक संकटात सापडलेला आहे.
बाजारभाव कमी असल्याचे संकट कमी की काय त्यातच नींबूत सोमेश्वर परिसरात एजंटचा झालेला सुळसुळाट देखील शेतकऱ्याच्या मानगुटी वरती बसत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.
टोमॅटोला बाजार नाही पट्टी वरती भरतो असे शेतकऱ्याला सांगून सहा रुपयाने विकलेला टोमॅटोची पट्टी चार रुपयांनी शेतकऱ्याला बनवून दिली जात असल्याचे देखील परिसरातील शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.
लबाडी करणाऱ्या अशा एजंटला वेळीच शेतकऱ्यांनी आवर घालावी अन्यथा भविष्यात काही लबाड एजंट शेतकऱ्याचे रक्त पिल्याशिवाय राहणार नाहीत.