• Home
  • सामाजिक
  • शेंडकरवाडी येथे मुंबई शहर पोलीस भरती झालेल्या युवकांचा सत्कार.
Image

शेंडकरवाडी येथे मुंबई शहर पोलीस भरती झालेल्या युवकांचा सत्कार.

प्रतिनिधी

सोमेश्वरनगर – नुकत्याच झालेल्या पोलीस भरती मध्ये बारामती शेंडकर वाडी येथे प्रणय खेंगरे (पुणे शहर), तेजस खेंगरे( मुंबई शहर) ,लखन माने(पुणे ग्रामीण),चेतन कोळपे(नवी मुंबई) या चार युवकांचा सत्कार पुष्पहार शाल श्रीफळ देऊन करण्यात आला. प्रमुख उपस्थितीत मान्यवरांचे स्वागत युवा नेते निखिल शेंङकर यांनी केले.

प्रमुख पाहुणे श्री सोमेश्वर कारखाना संचालक ऋषिकेश गायकवाड, माजी संचालक रुपचंद शेंडकर, आजी माजी सैनिक संघ अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, करंजेपुल दुरक्षेत्र पोलीस हवालदार अमोल भोसले, स्वामी विवेकानंद अभ्यासिका संस्थापक गणेश सावंत,निरा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बाळासाहेब शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला, यावेळी शेंडकर वाडी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम प्रसंगी मनोगतात पोलीस भरती विषयी शेंडकर वाडीतून असंख्य मुले भरती व्हावी आणि सोमेश्वरनगर सह शेंडकरवाडी गावं एक अधिकाऱ्याचे गावं म्हणून ओळखावं असे कार्यक्रम प्रसंगी मनोगतात राहुल (चम्मूभैया)शेंडकर,गणेश सावंत यांनी म्हटले.तर माजी संचालक रुपचंद शेंडकर बोलताना म्हणाले की डिफेन्स मध्ये २५ माजी सैनिक असून सिविल मध्ये इंजिनियर मेकॅनिकल अशा विविध पदांवर मुले कार्यरतही आहेत तसेच आजी माजी सैनिक संघटना सोमेश्वर परिसरात स्थापनेपासून यांचे विविध क्षेत्रातील कामाबद्दल कौतुक केले ,सोमेश्वरनगर परिसरातील तब्बल ४० विद्यार्थी

नुकत्याच झालेल्या पोलीस भरती झालेले असल्याने जिल्ह्यात चर्चा आहे…

कार्यक्रम आयोजन शेंडकरवाडी ग्रामस्थ यांनी केले होते कार्यक्रमास नामदेवराव शेंङकर सुरेशराव शेंङकर शहाजीराव शेंङकर सुभाषराव शेंङकर दादा कामठे मा.उपसरपंच सुनिल शेंङकर दादा चौधरी प्रदिप शेंङकर किरणराव शेंङकर जालिंदर शेंङकर संतोष शेंङकर करंजे सोसायटी मा.व्हाचेअरमन महेंद्र शेंङकर हनुमंतराव शेंङकर व महिला वर्ग उपस्थित होता.प्रास्ताविक अंकुश डोंबाळे तर आभार माजी संचालक रूपचंद शेंडकर व शिवाजी शेंडकर यांनी मानले.

Releated Posts

रक्तदान करुन वाढदिवस साजरा व पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली

कोरोना काळात व जम्मु-काश्मिर येथे आयोजित सिंदूर महारक्तदान शिबिरात आरोग्यदुत श्री.कृष्णमुर्ती जगताप यांचा सक्रिय सहभाग बारामती – वैद्यकिय,सामाजिक,…

ByBymnewsmarathi Feb 14, 2026

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनतर्फे पत्रकार दिनाच्या पत्रकारांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा.

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकार बांधवांचा…

ByBymnewsmarathi Jan 6, 2026

बारामती बिबट्या संदर्भातील चुकीच्या बातमीबाबत स्पष्टीकरण व जाहीर माफी.

आमच्या ‘एम न्यूज मराठी’ (M News Marathi) या न्यूज पोर्टलवर काल, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी बारामती परिसरात…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

भीमाशंकर मंदिर ३ महिने बंद ठेवण्याबाबत प्रशासकीय चर्चा; लवकरच होणार अंतिम निर्णय

प्रतिनिधी बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २८८.१७ कोटींचा विकास…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025