प्रतिनिधी –निंबुत ता बारामती हे बागायत सदन गाव ज्या गावाने संपुर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात ,आपला वेगळा ठसा निर्माण केला या गावानेच खासदारकी ,आमदारकी ,असे अनेक पदे भोगली अशा या निंबुत गावाला गेले तीन वर्षापासुन कायम स्वरुपी तलाठी ,ग्रामसेवक आणी कोतवाल मिळेना अनेक वेळा गावातील नागरीकांनी प्रशासनाला लेखी
,तोंङी विंनती केली अनेक दैनिकात या बाबत बातम्याही प्रसिध्द झाल्या परंतु प्रशासन गेंङ्याचे कातङी पागरुन स्तब्ध बसलेले दिसते नवीन शैक्षणिक वर्ष चालु होत आहे विद्यार्थ्यांना शालेय दाखले काढणे तसेच उत्पन्नाचे दाखले काढणे अशा विविध कामा करीता वणवण करावी लागते निराधार व्यक्तीसाठी उत्पन्नाचे दाखले ही या महीण्यात तहसिल कचेरीत जमा करावे लागतात याही लोंकाःची पळापळ सुरु आहे .मायबाप सरकारला यबाबत खुप विनवण्या केल्या परतु या प्रशासनाला घाम काय फुटेना
संपुर्ण निंबुत ग्रामस्थाच्यावतीने प्रशासनास विंनती आहे लवकरात लवकर आमच्या गावाला कायम स्वरुपी तलाठी ग्रामसेक कोतवाल मिळावा अन्यथा प्रशासनाला गावाच्या रोषाला सामोरे जावे लागेल या बाबत महाराष्ट्चे विरोधी पक्षनेते मा श्री आजितदादा पवार साहेबांना लेखी पञाद्वारे विनंती करणार असल्याचे ग्रामस्थानी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सागितले.