संपादक मधुकर बनसोडे.
नींबूत ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांनी ज्याप्रमाणे नींबूत गावामध्ये डीजे बंदीचा निर्णय घेतला या निर्णयाचे सर्व ग्रामस्थांकडून स्वागतच करण्यात आले मात्र अजून एक निर्णय घेणे गरजेचे आहे तो म्हणजे नींबूत गावामध्ये गुटखा बंदी केली पाहिजे अशी ग्रामस्थांची मागणी आता होऊ लागली आहे.
डीजे मुळे बीपी, वयोवृद्ध नागरीक, लहान मुलं यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने हा निर्णय घेतला तसाच हा अजून एक निर्णय घेऊन नींबूत गावातील तरुण पिढी जी आज व्यसनाधीन होत आहे, या तरुण पिढीला भविष्यात मोठ्या गंभीर आजाराला सामोरे जाऊ लागू नये यासाठी गुटखाबंदीचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेऊन गावातील तरुण मुलांचे जीवन बरबाद होण्यापासून वाचवावे.
अशी मागणी निंबूत गावातील ग्रामस्थ करत आहेत. खरंतर महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी कायदा लागू असताना सुद्धा गुटक्याची आवक होते कोठून हे देखील संबंधित प्रशासनाने पाहिले पाहिजे. याचे मेन डीलर कोण आहेत यांच्या जर मुस्क्या आवळल्या तर नक्कीच अनेक कुटुंब उध्वस्त होण्यापासून सावरतील.
का गुटका बंदी ही फक्त कागदावरती झाली असे देखील सामान्य नागरिक विचारू लागला आहे.
संबंधित प्रशासनाने वेळीच यामध्ये लक्ष घालून महाराष्ट्रातील तरुणांची चाललेली ही व्यसनबाजी थांबवावी.
प्रत्येक ग्रामपंचायतने आपल्या ग्रामसभेमध्ये गुटखाबंदी कायद्याची अंमलबजावणी करावी गावात गुटखा विक्रेत्यावरती कायदेशीर कारवाई करावी कदाचित तेव्हाच गुटखाबंदी होईल.