• Home
  • माझा जिल्हा
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रशासकिय भवन येथे आंबा फळरोपाचे वृक्षारोपण
Image

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रशासकिय भवन येथे आंबा फळरोपाचे वृक्षारोपण

प्रतिनिधी

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महसूल विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने साठ आंबा फळरोपाचे वृक्षारोपण प्रशासकिय भवनातील परिसरात आज करण्यात आले.

यावेळी तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, नायब तहसिलदार तुषार गुंजवटे, स्वाती गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके, वनपाल गणेश सरोदे, जहिर शेख, वनरक्षक दयानंद अवघडे याचबरोबर इतर अधिकारी कर्मचारी, नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी पर्यावरण संरक्षण संर्वधन बाबत प्रतिज्ञा करण्यात आली.

या कार्यक्रमात वृक्षसंवर्धन, प्लास्टीक कचरा निर्मुलन, इंधन बचतीबाबत नागरिकाना सामाजिक वनीकरण विभागामार्फत मार्गदर्शन करुन जनजागृती करण्यात आली.

Releated Posts

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026

हरित भविष्यासाठी संत निरंकारी मिशनचे प्रेरणादायी पाऊल

प्रतिनिधी ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त खंडाळा, लोणावळासह देशभरातील १८ ठिकाणी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान          …

ByBymnewsmarathi Jun 5, 2026

बिबटप्रवण क्षेत्रातील नागरिकांना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

प्रतिनिधी बिबट दिसल्यास वन विभागाशी संपर्क साधवा-आश्विनी शिंदे  बिबट प्रवण क्षेत्रात वन विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक सूचनांचे नागरिकांनी…

ByBymnewsmarathi May 16, 2026