प्रतिनिधी फिरोज भालदार
दि.19/02/2022 रोजी रात्री 11:30 वाचे सु।। मौजे वडगाव निबांऴकर गावचे हद्दीत को-हाऴे खुर्द रोडला रविंद्र शामराव जाधव यांचे मोकऴ्या शेतात
आरोपी सागर सर्जेराव चव्हाण वय 27 वर्ष ,शिवदंत्त उर्फ दादा श्रीधर सुर्यवंशी वय 23 वर्ष ,आरोपी रोहीत दत्तात्रय खोमणे वय 29 वर्ष व वृषाली वैभव यादव वय 23 वर्ष यांचे अनैतीक संबधातुन मयत नामे वैभव विठ्ठल यादव वय 31 वर्षे रा वडगाव निबांऴकर ता. बारामती जि पुणे यास त्याचे घरासमोरुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने त्यास उचलुन घेवुन चार चाकी वँगनर गाडीत घालुन को-हाऴे खुर्द रोडला घेवुन जावुन रविद्र शामराव जाधव यांचे मोकऴ्या शेतात नेहुन तेथे आरोपींने मयत वैभव यादव यास यांनी बांबुचे दांडक्याने ऊसाने लाथा बुक्याने ,जबर मारहाण करुन त्याचा खुन केला व पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने त्याचे प्रेत पाडेगाव ता .फलटन जि. सातारा येथील तरटीचा माऴ रोड जवऴील निरा उजवे कँनाँलचे पाण्यात टाकुन दिले, वगैरे मानव मिसींग रजिस्टर नं 13/2022 चे झाले तपासावरुन गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला आहे .
वडगाव निंबाळकर पो स्टे गु.र.नं :-368/2022 भा.द.वि .का.क .302,364,201,34. आरोपींला ताब्यात घेतले आहे .सदर गुन्हाचा दाखल अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे व पुढील तपास पोसई शेलार हे करीत आहेत ..