• Home
  • माझा जिल्हा
  • महसूल आणि वन विभागातर्फे पालखी विसाव्याच्या ठिकाणी रोपांचे वाटप
Image

महसूल आणि वन विभागातर्फे पालखी विसाव्याच्या ठिकाणी रोपांचे वाटप

प्रतिनिधी

 जिल्हाधिकारी पुणे यांचे संकल्पनेतुन आणि मुख्य वनसंरक्षक व उपवनसंरक्षक पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल आणि वन विभागाच्यावतीने हरितवारी अभियानांतर्गत पालखी विसाव्याच्या ठिकाणी रोपे, बीजगोळे व बीया वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

हे अभियान पालखी मार्गावरील वन परिक्षेत्राच्या सहकार्याने राबविण्यात येत असून भांबुर्डा व पुणे वनपरिक्षेत्रात सासवड वनपरिक्षेत्रात ५ हजार बीजगोळे व २५ हजार बीया वाटप करण्यात आल्या. तसेच मौजे लोणी काळभोर येथे ५० वारकऱ्यांमार्फत ५० वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमास वारकरी संप्रदायाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

वनविभागाकडून पालखी विसाव्याच्या ठिकाणांवर देहुगाव, आळंदी, जेजुरी, वाल्हे, नीरा, लोणंद, फलटण, बारामती, बेलवाडी रिंगण, वालचंदनगर व नातेपुते येथे वारकऱ्यांना बीज, बीजगोळे, रोप वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती वन विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026