• Home
  • सामाजिक
  • माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांची जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला
Image

माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांची जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला

प्रतिनिधी

सध्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेली आहे. सदर पालखी मार्गावर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय सुनील फुलारी यांनी आज यवत पासून पालखी महामार्गाच्या सुरक्षेची पाहणी केली

सुरक्षेबाबत वरिष्ठ अधिकारी व पोलीस घटकातील शेवटचा पोलीस अमलदर यांना समक्ष भेटून प्रत्येक पॉईंटवर सूचना दिल्या. प्रत्येक पालखी मुक्कामी व विसाव्याच्या ठिकाणी पब्लिक ऍड्रेस सिस्टम व्यवस्थित ठेवण्याबाबत व त्याचा सुरक्षा आढावा घेण्याबाबत सूचना केल्या तसेच इतर शासकीय खात्यांबरोबर योग्य तो समन्वय ठेवण्याबाबतच्या सूचना दिल्या. तसेच पालखीसोबतच्या सुरक्षा बद्दलची माहिती दिली.

तसेच सर्व वारकऱ्यांना पोलीस दलातर्फे संपूर्णपणे सुरक्षा दिली जाईल कोणत्याही प्रकारची अडचण वारकऱ्यांना येऊ देणार नाही अशी त्यांनी नमूद केले.

सदर वेळी बारामती शारदा प्रांगण या ठिकाणी त्यांनी मुक्काम स्थळी पाहणी करून सूचना दिल्या त्यांच्यासोबत अप्पर पोलीस अधीक्षक माननीय नितेश गट्टे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक बारामती शहर पोलीस निरीक्षक मोरे बारामती तालुका हेही हजर होते. उपस्थित पत्रकारांसोबत शारदा प्रांगण या ठिकाणी त्यांनी वार्तालाप केला.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनतर्फे पत्रकार दिनाच्या पत्रकारांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा.

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकार बांधवांचा…

ByBymnewsmarathi Jan 6, 2026

बारामती बिबट्या संदर्भातील चुकीच्या बातमीबाबत स्पष्टीकरण व जाहीर माफी.

आमच्या ‘एम न्यूज मराठी’ (M News Marathi) या न्यूज पोर्टलवर काल, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी बारामती परिसरात…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

भीमाशंकर मंदिर ३ महिने बंद ठेवण्याबाबत प्रशासकीय चर्चा; लवकरच होणार अंतिम निर्णय

प्रतिनिधी बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २८८.१७ कोटींचा विकास…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

गोमाता’ फक्त भाषणातच का? रस्त्यावर फेकल्या जाणाऱ्या वासरांच्या नशिबी मरणयातनाच!

सह संपादक- अक्षय थोरात ​ ​आपण गायीला ‘माता’ मानतो, तिची पूजा करतो. पण आज समाजातील एक भयाण वास्तव…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025