• Home
  • माझा जिल्हा
  • मु.सा. काकडे महाविद्यालयात एम.एस्सी. मायक्रोबायोलॉजी अभ्यासक्रमास मान्यता
Image

मु.सा. काकडे महाविद्यालयात एम.एस्सी. मायक्रोबायोलॉजी अभ्यासक्रमास मान्यता

प्रतिनिधी

सोमेश्वरनगर: मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयास नुकतीच सायन्स अँड टेक्नॉलॉजी विद्याशाखे अंतर्गत एम.एस्सी. मायक्रोबायोलॉजी या अभ्यासक्रमास महाराष्ट्र शासनाकडून मान्यता देण्यात आली. विज्ञान शाखेंतर्गत यापूर्वी एम एस्सी अनालिटिकल केमिस्ट्री हा अभ्यासक्रम महाविद्यालयात पूर्ण क्षमतेने चालवला जातो. नुकतीच महाविद्यालयास मायक्रोबायोलॉजी या अभ्यासक्रमास मान्यता मिळाल्यामुळे सोमेश्वरनगर पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विद्या शाखेतील शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

काकडे महाविद्यालयात एम.ए. इतिहास, मराठी, हिंदी, एम.कॉम. एम.एस्सी या पदव्युत्तर अभ्यासक्रमाशिवाय नव्याने तीन पी.एचडी. संशोधन केंद्रासही मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे महाविद्यालयात सर्व शाखांचे शिक्षण घेण्याची संधी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिले आहे. महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश काकडे म्हणाले की, सोमेश्वर पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी महाविद्यालयात विविध प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत. एम.एस्सी. मायक्रोबायोलॉजीची मान्यता मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना नवी संधी उपलब्ध झाल्याचे समाधान प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी व्यक्त केली.

तसेच त्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त केले.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026