प्रतिनिधी
मा. पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण यांचेकडील संदर्भीय क्र. २ नुसार पुणे ग्रामीण जिल्हयात विविध मागण्याकरिता पक्ष व संघटनाकडून आंदोलने, रैली, मोर्चे निदर्शने इत्यादीचे आयोजन केले जात आहे. तसेच पुणे ग्रामीण जिल्हयात दि.०६/१२/ २०२२ रोजी पुणे जिल्हयातील सहकारी सहकारी साखर कारखाना व सहकारी बँक यांचे संचालक मंडळाची निवणूक होणार असून दि. ०७/११/२०२२ रोजी मतमोजणी होणार आहे. सदर कारणास्तव पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये कायदा व सुव्यस्थेची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर कारणास्तव कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टीने महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७ (१), (३) चे आदेश जारी करणे आवश्यक वाटते.
त्याकरीता पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टीकोनातून महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७ (१) व (३) चे आदेश जारी करणे आवश्यक असलेने वरील बाबी विचारात घेऊन पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये दिनांक ०४/१२/२०२२ रोजी ००.०५ वाजले पासून ते दिनांक २७/११/२०२२ रोजी २४.०० वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) चा अंमल लागू केलेचा आदेश जारी करुनत्याची राजपत्रात प्रसिध्दी होणेस मा. पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण यांनी सदर पत्रान्वये विनंती केलेली आहे. आणि, ज्या अर्थी, माझी खात्री झाली आहे की, पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये शांतता व सुव्यवस्था राखणे कामी The Maharashtra Police Act (Bombay Act No.XXII of 1951) (Title Substituted For The Bombay Police Act, 1951) चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करणेस पुरेसे व सबळ कारण आहे. ४. त्याअर्थी, मी, हिम्मत खराडे, अपर जिल्हादंडाधिकारी, पुणे मला प्राप्त अधिकाराचा वापर करुन व The Maharashtra Police Act (Bombay Act No. XXII Of 1951 ) (Title Substituted For The Bombay Police Act, 1951 चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करुन पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये दिनांक •०४/११/२०२२ रोजी ००.०५ वाजले पासून ते दिनांक २७/११/२०२२ रोजी २४.०० वाजेपर्यंत १४ दिवसाकरीता
खाली नमूद केलेली कृत्य करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहे.
१. कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे.
२. दगड अथवा शस्त्रे किंवा अस्वे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे.
३. शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठया, बंदुका व शारिरीक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे.
४. कोणत्याही इसमाचे चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढा-यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.
५. जमाव तयार करणे, मोठयाने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे.
६. ज्यामुळे सभ्यता अगर नितिमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा अविर्भाव करणे कोणतेही जिन्नस तयार करुन त्याचा जनतेत प्रसार करणे.
७. ज्या योगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पध्दतीने The Maharashtra PoliceAct (Bombay Act No.XXIT OF १९५१) (Title Substituted For The Bombay Police Act, १९५१) चे कलम ३७ (१) व (३) विरुध्द वर्तन करणे.
८. The Maharashtra Police Act (Bombay Act No. XXII OF १९५१) (Title Substituted ForThe Bombay Police Act, १९५१) चे कलम ३७ चे पोटकलम (३) अन्वये पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे पूर्व परवानगी शिवाय सभा घेणे किंवा मिरवणूका काढणे.
९. वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरीष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.
१०. सदरचे आदेशाच्या प्रति महत्वाच्या ठिकाणी चिकटवून ध्वनीक्षेपकांवर प्रक्षेपित करुन योग्य ती प्रसिध्दी करावी.या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती The Maharashtra Police Act (Bombay Act No. XXII १९५१) ( Title Substituted For The Bombay Police Act, १९५१) चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.