पंचायत समिती अॅट्रोसिटी प्रचार, प्रसार, सलोखा कार्यशाळा संपन्न

माझा जिल्हा

प्रतिनिधी

कार्यशाळेस तहसिलदार, पोलीस निरीक्षक, बिडीओंच्या,‌ मुख्य मार्गदर्शक उपस्थित

सात वारसांचे पुनर्वसन केल्याबद्दल अजिनाथ राऊत यांचा तहसिलदारांच्या हस्ते सत्कार

अॅट्रोसिटी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ राऊत यांनी एन डी एम जे संघटणेच्या उस्मानाबाद टिमच्या वतीने केलेल्या पाठपुराव्यामुळे पंचायत समितीच्या सभागृहात दि. 27/06/2023 रोजी गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांनी कार्यशाळा आयोजित केली होती.

         याबाबत सविस्तर वृत्त असे कि अॅट्रोसिटी अॅक्ट कायद्याचा प्रचार – प्रसार, जातीय व सलोखा अबाधित राहुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पंचायत समिती परंडा स्तरावरून कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाचे अध्यक्ष परंड्याचे तहसीलदार घनशाम आडसुळ हे होते. मुख्य मार्गदर्शन नॅशनल दलीत मुव्हमेंट फाॅर जस्टीस या सामाजिक संघटनेचे राज्य सचिव अॅट्रोसिटी कायद्याचे अभ्यासक वैभव तानाजी गिते यांनी केले संविधानातील महत्त्वाच्या तरतुदी सांगत ॲट्रॉसिटी कायद्याची गरज का भासली त्याची व्याप्ती अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, तहसीलदार ग्रामसेवक पोलीस पाटील तलाठी यांच्या जबाबदाऱ्या सांगून ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होऊ नयेत तसेच अन्याय अत्याचार होऊ नये जातीय सलोखा आढावा याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले

तर विशेष सरकारी वकील अमोल सोनवणे यांनी ॲट्रॉसिटी ॲक्टची सखोल माहिती देवून शिक्षेचे प्रमाण वाढवण्यासाठी सरकारी वकील, पोलीस, जिल्हाधिकारी, समाज कल्याण अधिकारी यांची भूमिका त्यांचे विविध पैलू विविध न्यायालयाचे न्यायनिवाडे शासन निर्णय परिपत्रकांची माहिती देवून उपस्थित अधिकारी कर्मचारी व उपस्थितांना सोप्या भाषेमध्ये कायदा समजावून सांगितला. तहसीलदार आडसुळ यांनी ॲट्रॉसिटी कायदा हा अत्यंत महत्त्वाचा असून गोरगरीब वंचित समुहासाठी हा कायदा आवश्यक असल्याचे सांगत मी जोपर्यंत परंडा तालुक्यामध्ये आहे तोपर्यंत याची अंमलबजावणी करेल व शिक्षेचे प्रमाण वाढवेन असे सांगत मार्गदर्शक विशेष सरकारी वकील अमोल सोनवणे, सचिव वैभव गीते यांचेही आभार मानले व माझ्या स्वतःच्या ज्ञानात भर पडली असे हे उद्गार काढले, पो. नि. अमोद भुजबळ व सहाय्यक पोलीस निरीक्षक मुसळे यांनी तसेच या कार्यशाळेसाठी दिल्लीहून आवर्जून उपस्थित असलेले राष्ट्रीय दलित न्याय आंदोलन या संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक सागर कुंभारे व सामाजिक न्याय विभागाचे शेळके यांनीही मौल्यवान मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष अजिनाथ राऊत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत परांडा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील स्थिती परिस्थिती कायद्याचे दुरावस्था याबद्दल भाष्य केले. प्रास्ताविक गटविकास अधिकारी संतोष निगटिळक यांनी तर आभार प्रदर्शन धनाजी शिवपालक यांनी केले. या प्रसंगी आजिनाथ राऊत यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील 7 खून प्रकरणात पेन्शन मंजूर केल्याबद्दल तहसिलदार यांनी कौतुक करुन त्यांचा सन्मान केला. कार्यशाळेस रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राज्य सरचिटणीस संजय कुमार बनसोडे, विस्तार अधिकारी जोगदंड, तालुका विधी सेवा समितीचे कोर्ट कर्मचारी तांबे, राज्यनिरीक्षक दिलीप आदमाने, परंडा तालुक्यातील मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनुसुचित जाती – जमातीचे सरपंच व ग्रा. सदस्य, कोतवाल, तसेच पंचायत समितीचे तहसिल कार्यालयाचे कर्मचारी, राष्ट्रीय दलित न्याय आंदोलन या संघटनेचे अनेक पदाधिकारी वेगवेगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून हजर झाले होते तसेच विविध आंबेडकरवादी सम विचारी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.