प्रतिनिधी
पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु / मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन त्या नागरीकांना परत करणेसंदर्भात मा. श्री. अंकित गोयल सो… (भा.पो.से) पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचे सुचना व मार्गदर्शनाचे अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस दल मधील नवनिर्मित माळेगाव ठाणे हददीतुन नागरीकांचे गहाळ / हरविलेले मोबाईल बाबत माळेगाव पोलीस स्टेशन प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने हरविलेल्या मोबाईल शोध घेणेकरीता श्री किरण अवचर, पोलीस निरीक्षक, माळेगाव पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री.ज्ञानेश्वर सानप गोपनीय विभाग, माळेगाव पोलीस स्टेशन यांनी सायबर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण यांचेकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करुन त्यातुन प्राप्त माहीतीचे तांत्रिक विश्लेषण करुन 1) प्रशांत नानासो तावरे रा. सांगवी ता. बारामती जि. पुणे 2) सोमनाथ तुकाराम सावंत रा. मेडद ता. बारामती जि.पुणे 3) मनिष कुमार भग्गल रा. विदया प्रतिष्ठाण परीसर बारामती जि. पुणे 4) नितीन विठठ्ल गायकवाड रा. वरकुटे बु ता. इंदापुर जि.पुणे 5) अमोल बाळु मदने रा. गिरवी ता. फलटण जि.सातारा 6) शारदा रामकृष्ण वाकुडे रा. कवठेकरवस्ती माळेगाव नगरपंचायत ता. बारामती जि.पुणे 7) स्नेहल हनुमंत जाधव रा.सांगवी ता. बारामती जि.पुणे 8) दादासाहेब खोमणे रा. जळगाव सुपे ता. बारामती जि. पुणे 9) प्रकाश मुरलीधर यादव रा.सायंबाचीवाडी ता. बारामती जि. पुणे 10 ) जनार्धन ज्ञानदेव राऊत रा. खटकेवस्ती गोखळी ता. फलटण जि. सातारा असे अ.क्र. 1 ते 10 यांचे एकुण 1,25,000/- रु. ( अक्षरी एक लाख 25 हजार रु. जु.वा. किं.अं.) चे एकूण 10 मोबाईल हॅन्डसेट हे कर्नाटक तसेच महाराष्ट्र राज्य मधील विविध ठिकाणांहून शोध घेवुन ते माळेगाव पोलीस स्टेशन येथे प्राप्त करुन घेण्यात आलेले आहेत.
सदरचे मोबाईल हे दिनांक 06/07/2023 रोजी सायं 07.00 वा. चे सुमारास बारामती पोलीस व नगरपरिषद बारामती यांचे वतीने नागरीकांसाठी मुक्ताई लॉन्स मंगल कार्यालय बारामती या ठिकाणी आयोजित करणेत आलेल्या परीसंवाद बैठक दरम्यान मा. श्री आनंद भोईटे सो अपर पोलीस पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा. श्री. गणेश इंगळे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग यांचे हस्ते वरील मुळ मालकांना परत दिलेले आहेत.
सदरची कामगिरी ही मा.श्री. अंकित गोयल सो. (भा.पो.से) पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. श्री. आनंद भोईटे सो. अपर पोलीस पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, श्री. गणेश इंगळे सो उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, श्री. प्रविण खानापुरे, सायबर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण, श्री. किरण अवचर, पोलीस निरीक्षक, माळेगाव पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री. ज्ञानेश्वर सानप गोपनीय विभाग, माळेगाव पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे. तसेच याकामी पोलीस नाईक श्री महेश कोळी सायबर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण यांनी सहकार्य केलेले असुन नागरीकांचे किंमती हरविलेले मोबाईल हे माळेगाव पोलीस स्टेशन कडुन शोध घेतलेमुळे पुन्हा ताब्यात मिळालेने मोबाईल मालक व सदर उपस्थित समाधान व्यक्त केलेले आहे.
टिप माळेगाव पोलीस स्टेशन कडुन नाहे में 2023 मध्ये 79,000/- किंमतीच्या एकुण 07 मोबाईल सह एकूण दोन – लाख 4 हजार रुपये किंमतीचे 17 मोबाईल नागरीकांचे हरविलेले मोबाईल शोधुन परत देणेत यश आलेले आहे..