येणाऱ्या श्रावण महिन्यासाठी सोमेश्वर देवस्थान करंजे येथे नियोजन मीटिंग संपन्न.

सामाजिक

प्रतिनिधी

सोमेश्वरनगर आज श्रावण महीन्यातील यात्रा नियोजन मिटींग सोमेश्वर देवस्थान येथे आयोजित करण्यात आली होती.मिटींग साठी सर्व मिठाई व प्रसाद व्यवसायिक उपस्थित होते. दुकान लाईन व व्यवसायिक यांच्या अङीअङचणी दूर करण्यासाठी विस्वस्त मंङळांने मिटींग आयोजित केली होती.मिटींग मधील विषय दुकानलाईन सोङून पहील्या सारखे दुकान टाकण्यास परवानगी मिळावी. व्यवसायिक व्यापारी मंङळींचा गाळ्या मध्ये व्यवसाय धंदा होत नाही.

आसा व्यवसायिक मंङळींचा विषय होता.परंतू एवढा मोठा देवस्थानचा विकास करून उपयोग काय.देवस्थानचा विकास आराखडा कशासाठी बनविला.श्रावण महिन्यात सोमेश्वर देवस्थानला भाविकांची गर्दी होते.त्यात शेवटच्या सोमवारी यात्रे दिवसी लाखोने भाविक दर्शनासाठी येतात.व्यवसाय होत नाही हे कारण न पटण्यासारखे आहे.गेल्या वर्षी जागेवरून वाद विवाद झाले.बारामतीचे तहसिलदार व प्रांतसाहेब यांनी मध्यस्ती करून वाद मिटविला.व दुकानलाईन (गाळे) सोङून दुकानलाईन लावण्यास हरकत घातली.किंवा कोणीही गाळे सोङून दुकान टाकले तर कार्यवाही केली जाईल. परंतू या वर्षी सर्व नियम धाब्यावर बसवण्याचे काम चालू आहे.मंदीर परिसरात शांतता लाभावी.बाहेरील गावावरून आलेल्या भाविकांना अडचणीचा सामना करावा लागू नये.पोलीस प्रशासन यांच्यावर बंदोबस्त करते वेळी सुटसुटीत वातावरण राहावे.यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत मिटींग लावून योग्य निर्णय झाला होता.तो निर्णय तसाच राहावा हिच सर्व करंजे पंचक्रोशीतील लोकप्रतिनिधी व भाविकांची मनोकामना आहे.एवढा मंदिर परिसरातील विकास करून काय फायदा बाहेरील गावातील देवस्थान विकासापासून वंचित आहेत.सोमेश्वर देवस्थानचा विकास दूरदृष्टी ठेवून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय मा.अजितदादा पवार यांनी कशासाठी केला आसा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट यांनी गेल्या वर्षी झालेला निर्णय अभादित ठेवावा त्यात काहीही बदल करू नयेत.