कारगिल विजय दिवस २६ जुलै रोजी होणार साजरा

माझा जिल्हा

प्रतिनिधी

शहीद सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी राज्यात २६ जुलै हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षीही २४ वा ‘कारगिल विजय दिवस’ सैनिक कल्याण विभागाच्या कार्यालयातील हिरकणी हॉल मध्ये २६ जुलै रोजी सायं. ४ वाजता साजरा करण्यात येणार असल्याची माहिती सैनिक कल्याण विभागाचे संचालक ब्रिगेडियर राजेश गायकवाड यांनी दिली आहे.

या कार्यक्रमास पुणे जिल्ह्यातील कारगिल युद्धातील शहीद सैनिकांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता व अपंगत्व प्राप्त जवान यांना ‘एस. के. एफ. लिमीटेड’ व ‘बोनीसा वर्ल्ड’ या नामांकित संस्थेकडून ‘भेटवस्तू’ आणि ‘एक इंडिया मिशन रिंग’ देण्यात येणार असून सैनिक कल्याण विभागामार्फत त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.

या राष्ट्रीय कार्यक्रमास पुणे जिल्ह्यातील माजी सैनिक विधवा व माजी सैनिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही सैनिक कल्याण विभागाने केले आहे.