मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

ससून रुग्णालयातर्फे रक्तदान अभियानाचे आयोजन

mnewsmarathi 21 Feb 2023 1 मिनिट वाचन 8,998 वाचन

प्रतिनिधी

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने राज्यात रक्तदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे यासाठी नागरिकांनी रक्तदान मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे.

मोहिमेअंतर्गत बै.जी.वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयाच्यावतीने शहरातील तीन ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरात ३७१ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. शहरातील ससून रुग्णालय, टिळक रोड येथील सचिन ढवळे अकॅडमी आणि निकमार विद्यापीठ बाणेर येथे या शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

रक्तदान मोहिमेचे उद्घाटन ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांनी केले. यावेळी उपअधिष्ठाता मुरलीधर तांबे, डॉ.अजय तावरे, डॉ.भारत दासवानी, डॉ.निला नकाते, डॉ.सोमनाथ खेडकर, डॉ.मानसिंग साबळे, डॉ.संजय तांबे आदी उपस्थित होते.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi