मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

रक्तदान शिबीरामध्ये १७१ रक्त बाटल्यांचे संकलन

mnewsmarathi 22 Jul 2023 1 मिनिट वाचन 9,159 वाचन

प्रतिनिधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित रक्तदान शिबीरामध्ये १७१ रक्त बाटल्या संकलन झाले आहेत.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते उर्फ नाना पाटील यांच्या हस्ते रक्तदान शिबीरांचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी नेत्रचिकित्साशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. विवेक सहस्त्रबुद्धे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल शिंदे, शरीरक्रियाशास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉ. अंजली शेटे, शरीरविकृतीशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ शारदा राणे, प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे आदी उपस्थित होते.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi