सोमेश्वर कारखान्याचा नादच खुळा. तब्बल ३३५० रु. ऊसदर जाहिर करणारा ठरला राज्यातील पहिला कारखाना

माझा जिल्हा

प्रतिनिधी

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने मागील २०२२-२३ गाळप हंगामाकरीता राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रति मे. टन ३३५०/- रु. ऊसदर जाहीर केला असुन संपुर्ण राज्यात एफआरपीपेक्षा जास्त दर देणारा सोमेश्वर कारखाना प्रति मे. टन ५०० राज्यातील क्रमांक एकचा कारखाना राहिला आहे. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये या सर्वोच्च ऊसदरावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.

श्री जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, मागील गाळप हंगाम २०२२ – २३ मध्ये कारखान्याने एकुण १२,५६,७६८ मे. टनाचे गाळप केले असुन सरासरी ११.९२६ टक्के साखर उतारा राखीत १४,६७,९५० साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. त्याचसोबत कारखान्याच्या कोजन प्रकल्पामधुन ८,९२,५१,७७९ युनिट्सची वीजनिर्मिती केली असुन ५,००,७१,७९७ युनिट्सची वीजविक्री केलेली आहे. त्याचप्रमाणे कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पातून ९१,०७,२८७ लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतले असुन सोबत ४१,९५,९८४ लिटर्स इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे. आपल्या सोमेश्वर कारखान्याची सन २०२२-२३ हंगामाची २८५०/- रु. प्रति मे.टन इतकी एफ.आर.पी. होती त्यावर कारखान्याने आजअखेर सभासद व बिगर सभासद यांना २९००/- रु. प्रति मे.टन प्रमाणे रक्कम सभासदांच्या खात्यावर वर्ग केली होती. उर्वरीत रक्कम दिवाळीपूर्वी सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे.

काटकसर व उत्तम नियोजनपुर्व कारभार आदरणीय अजितदादा पवार यांचे वैयक्तिक कारखाना प्रशासनावर असणारे काळजीपुर्वक लक्ष व त्यांचे वेळोवेळीचे मार्गदर्शन त्याचसोबत संचालक मंडळाने ठरवलेले साखर निर्यातीचे योग्य धोरण व साखर विक्रीचा निर्णय याचसोबत कोजन व डिस्टीलरीमधुन मिळालेले अधिकचे ५० कोटी रुपयांचे उत्पादन यामुळे आपला सोमेश्वर सर्वोच्च ऊसदराची परंपरा कायम राखु शकला.

 

श्री. जगताप पुढे म्हणाले की, सहकारातले जाणते व ज्यांची आपल्या साखर कारखानदारीबद्दल नेहमीच तळमळ व आस्था असते असे आदरणीय अजितदादा पवार यांचे सदैव सहकारी कारखाना वाढवणे व टिकवणे तसेच शेतकर्यांना न्याय देणे यावर बारकाईने लक्ष असते. त्यामुळे आदरणीय अजितदादा यांना कारखान्याचा ताळेबंद दाखवल्यानंतर गुणवत्तेवर अधिकाअधिक भाव देवुन शेतकर्यांना न्याय दया अशा सुचना त्यांनी केल्या. अजितदादांच्या सहकाराला पाठींबा देण्याच्या या भुमिकेमुळे आमचा शेतकरी समाधानी झाला असुन आदरणीय दादांच्या मार्गदर्शनामुळे हा ऐतिहासिक दर देवु शकलो याचे समाधान आहे असेही श्री. जगताप म्हणाले.

 

सभासद व बिगर सभासद असा भेदभाव न करता सोमेश्वर हा सर्वोच्च ऊसदर देत आहे याबद्दल आम्हा संचालक मंडळास याचा अभिमान असल्याचेही श्री. जगताप म्हणाले. कारखान्याचे सभासद अधिकारी- कामगार, ऊसतोडणी वाहतुकदार कामगार यांच्या सहकार्यामुळेच सोमेश्वरची घौडदोड यशस्वीरित्या सुरु असुन यापुढील काळातही आपणा सर्वांचे सहकार्य लाभेल असा विश्वास श्री जगताप यांनी व्यक्त केला. कारखाना प्रशासनात देशाचे जेष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार व संसदरत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांचे वेळोवेळी संचालक मंडळास मार्गदर्शन लाभत असते व त्यांचे नेहमी अडचणीत कारखान्यास सहकार्य मिळते याबद्दल मी संचालक मंडळाच्या वतीने या सर्वांचे आभार मानतो असेही श्री. जगताप म्हणाले.

 

श्री. जगताप पुढे म्हणाले की, गेल्या ५ हंगामात आपण सलग ३०००/- रु.हुन जास्त ऊसदर देत असुन हा दर देत असताना यापुढील काळातही कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील गेटकेनधारक व सभासद यांना एकसारखा सर्वोच्च ऊसदर देण्यासाठी कारखाना कटिबद्ध राहिल असेही श्री. जगताप म्हणाले.

 

सोमेश्वर कारखाना संपुर्ण राज्यात सर्वार्थाने नावलौकीक मिळवीलेला कारखाना असुन यापुढील काळात सर्वोच्च ऊसदराची तसेच सभासद – बीगर सभासद एकच ऊसदराची परंपरा कायम राखण्यासाठी सर्व सभासद शेतक-यांनी यापुढील काळातही आपल्या सोमेश्वर कारखान्यासच ऊस घालावे असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम जगताप यांनी केले.