• Home
  • सामाजिक
  • बारामती ! वडगाव निंबाळकर येथे बॅनर (पोस्टर) लावताना ग्रामपंचायतची परवानगी घेतली जाते का ?
Image

बारामती ! वडगाव निंबाळकर येथे बॅनर (पोस्टर) लावताना ग्रामपंचायतची परवानगी घेतली जाते का ?

  • प्रतिनिधी – फिरोज भालदार

    वडगाव निंबाळकर येथे चौकाचौकातून कुणाला शुभेच्छा देण्यासाठी तर कुणाची जाहिरात करण्यासाठी बॅनर लावले जातात हे जे बॅनर लावले जातात याची परवानगी ग्रामपंचायत मधून घेलती जाते का ? बॅनर लावणारे आपल्या बॅनर ची काळजी घेतात का ? की ह्या बॅनर मुळे कुणाला त्रास तर होत नाही ना .कोणाला अडचण तर होत नाही ना ह्याच प्रमाणे वडगाव निंबाळकर मध्ये महात्मा फुले चौकामध्ये व उमाजी नाईक चौक या ठिकाणी रोड च्या कडेला जे बॅनर लावले जातात ते बॅनर नीरा बारामती रोडवरून येणाऱ्या जानाऱ्या लोकांचे लक्ष्य वेधून घेतात व ह्यामुळे वडगाव निंबाळकर याठिकाणी नीरा बारामती रोडवर अपघात होण्याची शक्यता आहे . वडगाव निंबाळकर मध्ये बॅनर लावले जातात यांनी ग्रामपंचायत ची परवानगी घेतली आहे का नाही याची चौकशी ग्रामपंचायत कर्मचारी किंवा अधिकारी करतात का ?

    महात्मा फुले चौकामध्ये एस टी चे स्टँड आहे त्याठिकाणी देखील बॅनर लावले जातात यामुळे त्याठिकाणी एस टी चे (स्टँड) बसस्थानक आहे म्हणून त्या लावले जाणारे बॅनर मुळे प्रवाशांना एस टी स्टँड दिसत नाही. यामुळे प्रवासी एस टी येईपर्यंत रस्त्यावरच उभे राहून एस टी ची वाट पाहत असतात . हे विनापरवाना (पोस्टर ) बॅनर लावणाऱ्यांवर प्रशासन कारवाई करणार का ? का अश्याच प्रकारे पुढे बॅनर लावणे चालू राहणार . वडगाव निंबाळकर हे गाव असेच जाहिरातीचे गाव म्हणूनच ओळखले जाणार का असा प्रश्न वडगाव निंबाळकर ग्रामस्थांमध्ये पडला आहे . लवकरच आतापर्यंत किती नागरिकांनी बॅनर लावण्यासाठी परवानगी मागितली आहे याची माहिती माहिती अधिकारात ग्रामपंचायत प्रशासनाकडे मागवली जाणार आहे. तसेच आतापर्यंत किती अनाधिकृत बॅनर वरती कारवाई केली याची देखील माहिती मागवली जाणार आहे.

Releated Posts

रक्तदान करुन वाढदिवस साजरा व पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली

कोरोना काळात व जम्मु-काश्मिर येथे आयोजित सिंदूर महारक्तदान शिबिरात आरोग्यदुत श्री.कृष्णमुर्ती जगताप यांचा सक्रिय सहभाग बारामती – वैद्यकिय,सामाजिक,…

ByBymnewsmarathi Feb 14, 2026

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनतर्फे पत्रकार दिनाच्या पत्रकारांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा.

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकार बांधवांचा…

ByBymnewsmarathi Jan 6, 2026

बारामती बिबट्या संदर्भातील चुकीच्या बातमीबाबत स्पष्टीकरण व जाहीर माफी.

आमच्या ‘एम न्यूज मराठी’ (M News Marathi) या न्यूज पोर्टलवर काल, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी बारामती परिसरात…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

भीमाशंकर मंदिर ३ महिने बंद ठेवण्याबाबत प्रशासकीय चर्चा; लवकरच होणार अंतिम निर्णय

प्रतिनिधी बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २८८.१७ कोटींचा विकास…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025