Image

आधारची कागदपत्रे अद्ययावत करण्याबाबत

प्रतिनिधी

गेल्या दशकात आधार क्रमांक हा भारतातील रहिवाशांच्या ओळखीचा पुरावा म्हणून उदयास आला आहे. अनेक सरकारी योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर केला जातो.

ज्या रहिवाशांनी 10 वर्षांपूर्वी आधार क्रमांक घेतला आहे आणि ज्यांनी तेव्हापासून ते कधीच अद्ययावत केलेले नाहीत, अशा आधार क्रमांक धारकांना त्यांच्या कागदपत्रांच्या अद्ययावतीकरणासाठी प्रोत्साहित केले जाते.

मात्र ही प्रक्रिया अनिवार्य करण्यात आल्याचे चुकीचे वृत्त गुरुवारी काही वृत्तपत्रांनी दिले आहे. या चुकीच्या वृत्ताकडे आणि समाज माध्यमांतील पोस्ट्सकडे दुर्लक्ष करण्याची सूचना करण्यात आली आहे.

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (युआयडीएआय) ने यापूर्वी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. आधार कागदपत्रे अद्ययावत ठेवण्यासाठी आपण रहिवाशांना आवाहन आणि प्रोत्साहित करत आहोत, असे त्यात युआयडीएआयने अधोरेखित केले आहे. रहिवासी दर 10 वर्षांनी आधार कागदपत्रे अद्ययावत करू शकतात हे नुकत्याच जारी केलेल्या राजपत्रित अधिसूचनेत स्पष्टपणे नमूद केले आहे.

त्यामुळे राहणीमान सुलभ होण्यास, उत्तम सेवा प्रदान करण्यात मदत होते आणि अचूक प्रमाणीकरण होते. युआयडीएआयने नेहमीच रहिवाशांना त्यांची कागदपत्रे अद्ययावत ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले आहे आणि ही अधिसूचना त्या दिशेने आणखी एक पाऊल आहे.

Releated Posts

बिबटप्रवण क्षेत्रातील नागरिकांना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

प्रतिनिधी बिबट दिसल्यास वन विभागाशी संपर्क साधवा-आश्विनी शिंदे  बिबट प्रवण क्षेत्रात वन विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक सूचनांचे नागरिकांनी…

ByBymnewsmarathi May 16, 2026

बिबटप्रवण क्षेत्रातील नागरिकांना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

प्रतिनिधी बिबट दिसल्यास वन विभागाशी संपर्क साधवा-आश्विनी शिंदे  बिबट प्रवण क्षेत्रात वन विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक सूचनांचे नागरिकांनी…

ByBymnewsmarathi May 16, 2026

उन्हाळ्याचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असतानाच लग्नसराईचा हंगाम मात्र जोरात सुरू आहे…

प्रतिनिधी (लेखन- सोपान कुचेकर) गावोगावी मंगल कार्यालये, बँड-बाजा, वाजंत्री आणि पाहुण्यांची लगबग पाहायला मिळत आहे… पहाटेपासून सुरू होणारी…

ByBymnewsmarathi May 13, 2026

हृदयसम्राट बाबा हरदेव सिंह यांना अर्पित ‘समर्पण दिवस’

प्रतिनिधी             मानवतेच्या कल्याणासाठी एखाद्या महान आत्म्याचे संपूर्ण जीवन समर्पित झाले की, त्या…

ByBymnewsmarathi May 12, 2026