• Home
  • सामाजिक
  • पत्रकार संदीप महाजन यांच्यावर हल्ला करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई करावी यासाठी संपादक पत्रकार संघ बारामती आक्रमक …
Image

पत्रकार संदीप महाजन यांच्यावर हल्ला करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई करावी यासाठी संपादक पत्रकार संघ बारामती आक्रमक …

प्रतिनिधी – राज्यात पत्रकारांसाठी संरक्षण कायदा लागू होऊन सुध्दा पत्रकारांवरील हल्ले काही थांबायला तयार नाहीत. याचे प्रत्येय नुकतेच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील एका घटनेच्या संदर्भात संदीप महाजन यांनी बातमी दिली होती. त्याचा राग धरून आ.किशोर पाटील यांनी पत्रकार महाजन यांना चार दिवसांपुर्वी फोन करून अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली होती. ही क्लीप व्हायरल झाल्यावर आमदारांनी साळसुदपणे शिविगाळीचे समर्थन देखील केले होते.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असुन समाजातील तळागाळातील जनतेच्या मुलभूत गरजा लक्षात घेऊन आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडत निस्वार्थपणे हक्क मिळवून देण्याचे काम करतो. परंतु समाजातील काही गुंड प्रवृत्तीच्या विकृत मानसांनी पत्रकारांवर सततचे हल्ले करतात. याच मानसिकतेतून पत्रकार श्री संदीप महाजन यांच्यावर शिवसेना ( शिंदे गट) आमदारांनी शिविगाळ केली. व कार्यकर्तेच्या चार पाच जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला.
तसेच आमदाराने पत्रकारांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ करण्याच परवाना घेतला आहे का? याला शासनाने पाठीशी न घालता यांची आमदारकी निलंबित करावी अन्यथा सरकार पाठीशी घालते का? असा प्रश्न राज्यातील तमाम पत्रकारांना पडला आहे. असे पत्रकारांवर नेहमी हल्ले होत असतांना कायदे करून त्याची कठोर अमलबजावणी करण्यास शासनमात्र अपयशी ठरल्याचे दिसुन येत आहे. परंतु अश्या हल्ल्यांना आम्ही घाबरणार नाही किंवा लेखणीही थांबणार नाही. आम्ही आमच्या लेखणीच्या माध्यमातून सत्य लिहिल्याशिवाय थांबनार नाही. असा पवित्रा घेत संपादक पत्रकार संघ बारामतीच्या वतीने या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. सदरील हल्ल्याच्या गुन्हेगारांना कठोरातील कठोर कारवाई करावी. व या हल्लेखोरांना जामिन न होता लवकरच शिक्षा मिळाली पाहिजे तेव्हाच शासन पत्रकारा बाबत संवेदनशील समजु अशी संपादक पत्रकार संघ बारामती यांनी प्रांतअधिकारी यांना मागणी करत याबाबत निवेदन दिले आहे. सदर पत्र रमेश बैस राज्यपाल महाराष्ट्र राज्य, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, व राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांना देखील पाठवण्यात आले आहे.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनतर्फे पत्रकार दिनाच्या पत्रकारांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा.

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकार बांधवांचा…

ByBymnewsmarathi Jan 6, 2026

बारामती बिबट्या संदर्भातील चुकीच्या बातमीबाबत स्पष्टीकरण व जाहीर माफी.

आमच्या ‘एम न्यूज मराठी’ (M News Marathi) या न्यूज पोर्टलवर काल, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी बारामती परिसरात…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

भीमाशंकर मंदिर ३ महिने बंद ठेवण्याबाबत प्रशासकीय चर्चा; लवकरच होणार अंतिम निर्णय

प्रतिनिधी बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २८८.१७ कोटींचा विकास…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

गोमाता’ फक्त भाषणातच का? रस्त्यावर फेकल्या जाणाऱ्या वासरांच्या नशिबी मरणयातनाच!

सह संपादक- अक्षय थोरात ​ ​आपण गायीला ‘माता’ मानतो, तिची पूजा करतो. पण आज समाजातील एक भयाण वास्तव…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025