• Home
  • माझा जिल्हा
  • स्वातंत्र्य दिनानिमित्त उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण
Image

स्वातंत्र्य दिनानिमित्त उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

प्रतिनिधी

भारतीय स्वातंत्र्याचा ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते प्रशासकीय भवन येथे ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय, पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थांनी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले. यावेळी राष्ट्रीय तंबाखू नियत्रंण कार्यक्रमांतर्गत तंबाखू मुक्तीबाबत जनजागृतीपर शपथ देण्यात आली. उपविभागीय अधिकारी श्री. नावडकर यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारुन सर्व उपस्थित मान्यवरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमानंतर त्यांनी प्रशासकीय भवन परिसरात वृक्षारोपणही केले.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026