प्रतिनिधी – फिरोज भालदार
वडगाव निंबाळकर येथील रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला . इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आज स्वातंत्र भारताला ७६ वर्ष पूर्ण झाली. या आनंदमयी परवाची सुरुवात सरस्वतिच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . राष्ट्रगीत, राज्य गीत ,ध्वजगीत , तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम त्याचप्रकारे चिमुकल्या विद्यार्थांची मनोगते अशा विविध कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . यावेळी सदोबाचीवाडीचे उपसरपंच तसेच मु.सा. काकडे कॉलेजचे संचालक व बाबुराव दादा सोसायटी चे नवनिर्वाचित चेअरमन ऋषिकेश भैय्या धुमाळ, युवक अध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने, नितीन आप्पा गायकवाड, अलकाताई भंडलकर पुणे जिल्हा संघटिका,
पत्रकार सुनील जाधव बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघ उपाध्यक्ष , वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत सदस्य अजित भोसले , प्रेमलता रांगोळे, राहुल आगम, संतोष दरेकर,लखन लोणकर मुंबई पोलीस , रयजिंग स्टार स्कूल शाळेच्या अध्यक्षा कांचन काटे , माधव काटे, रामदास काटे , प्रिन्सिपल श्रद्धा मस्कर, रूपाली नलवडे, प्रिया भापकर, दिपाली चव्हाण , शिवाजी साळुंखे उपस्थित होते. याच प्रकारे ग्रामस्थ व विद्यार्थी पालकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती .
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन साळवे मॅडम यांनी केले तर मान्यवरांचे आभार पूजा गाढवे यांनी मानले.