स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन.

माझा जिल्हा

प्रतिनिधि

सावळज येतील रत्नदीप पब्लिक स्कूल मध्ये आज 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. यावेळी माजी स्वातंत्र्यसैनिक मारुती कांबळे तसेच कमिटी मेंबर्स आणि शाळेच्या मुख्याध्यापिका आणि चेअरमन यांबरोबर पालक वर्ग यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी बालचमूंचे नृत्य आणि भाषण ही करण्यात आले. तसेच छोट्या मुलांनी देशभक्तीपर गीत ही सादर केले. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कविता स्पर्धा आणि देशभक्तीपर गीत स्पर्धा ही उत्साह पूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांना जिलेबी ,मिठाई, चॉकलेट यांचे वाटप ही करण्यात आले. नाविन्यपूर्ण सजावटीमुळे कार्यक्रमाला वेगळीच शोभा आली. यावेळी शिक्षकांची कलाकुसर ही दिसून येते .छोट्या मुलांचे डान्स खूप छान प्रकारे सादर करण्यात आले याबद्दल परिसरातून कौतुक करण्यात आले .यावेळी उपस्थित पाहुणे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका वृषाली धेंडे यांनी मुलांना स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रबोधन केले .

अशा प्रकारे उत्साह पूर्ण वातावरणात स्वातंत्र्य दिनाची सांगता विद्यार्थी, पालक वर्ग ,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थित कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने चेअरमन यांच्यामार्फत पार पडली.