बारामती ! श्रावणचा पहिला सोमवार सोमेश्वर मंदिर येथे हजारो भाविक नतमस्तक . वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन कडून चोख बंदोबस्ताचे नियोजन.

माझा जिल्हा

प्रतिनिधी – फिरोज भालदार

श्रावण महिना चालू असून सोमेश्वर नगरीमध्ये सोमेश्वरमंदिर येथे लांब लांबून भाविक दर्शनासाठी येत असतात . श्रावण महिना चालू असून सोमेश्वर मंदिर येथे प्रशासनाकडून दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे पोलिस सहायक निरीक्षक सचिन काळे व करंजे आउटपोस्ट चे पोलिस सहायक उपनिरीक्षक योगेश शेलार यांच्या सह सहकाऱ्यांनी चोक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे . याचबरोबर होळ प्राथमिक आरोग्य केंद्र व साई सेवा मल्टीस्पेशालिस्ट यांच्यावतीने भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे .

सोमेश्वर मंदिर देवस्थान यांच्यावतीने दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी स्वच्छ पाणी व मोठ्या प्रमाणत अन्नदानाची सोय करण्यात येत असते . मंदिराचे ट्रस्टी यांच्याकडून श्रावण महिन्यामध्ये मंदिरामध्ये किंवा मंदिराच्या आवारामध्ये घानिचे प्रमाण वाडणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे . श्रावणातील प्रत्येक सोमवारी सोमेश्वर मंदिर दर्शनासाठी एस टी महामंडळाकडून यात्रा स्पेशल एस टी बसेस सोडण्यात आलेले आहेत . जे भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात त्यांच्या वाहनांसाठी सुसज्ज अशी पार्किंग ची सोय करण्यात आलेली आहे .
आजचा महाप्रसाद व दुपारची खिचडी वाटप.
विक्रम आप्पा भोसले, गोरख राव इंगळे, संदीप साळुंखे, यांच्यावतीने करण्यात आले.
तर संध्याकाळचा महाप्रसाद सोमेश्वर चे चेअरमन पुरुषोत्तम दादा जगताप यांच्याकडून होणार आहे