प्रतिनिधी
देऊळगाव गाडा ता. दौंड जि. पुणे येथील दीपगृह अकॅडमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेने यावर्षी पहिल्यांदाच मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. अत्यंत उस्फुर्तपणे ही स्पर्धा पार पडली. यात एकूण २०० स्पर्धकांनी सहभाग घेतला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा ड्रॉप बॉल असोसिएशन चे अध्यक्ष आ.श्री. प्रमोद पवार सर आणि पुणे जिल्हा ड्रॉप बॉल असोसिएशन च्या सेक्रेटरी आ.रुपालीताई पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आदरणीय अतिथी म्हणून श्री.सौरभ शिंदे, एन.आय. एस कोच, श्री.संदीप टेंगले ( संस्थापक अध्यक्ष, समर्थ अकॅडमी, चौफुला), श्री. रमेश वत्रे (सकाळ पत्रकार), विजय चव्हाण, (पत्रकार, पुढारी) हे उपस्थित होते. *दीपगृह अकॅडमी शाळा नेहमीच सर्व समावेषित मुलांच्या क्वालिटी एज्युकेशन वर भर देणारी दौंड तालुक्यातील अग्रेसर आणि नामांकित शाळा आहे. यावर्षीपासुन विशेष गरजा असणा-या मुलांसाठी ही शाळा सुरू करण्यात आली आहे. *रन टू लर्न* हे ब्रीदवाक्य अवलंबूनच शाळेने यावर्षी पहिल्यांदाच मॅरेथॉन स्पर्धा सर्व वयोगटातील मुलांसाठी तसेच पालकांसाठी ही आयोजित केली होती. मॅरेथॉन यशस्वीपणे पार करण्यासाठी ट्रॅफिक पोलिस विभाग,यवत तसेच पानसरे साहेब व केडगाव पोलिस ठाण्यातील सर्व अधिकारी वर्ग यांचे विशेष सहकार्य लाभले. कै.तुकाराम धायगुडे फाउंडेशन, चौफुला यांच्या मार्फत मोफत डॉक्टर व रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. दौंड तालुक्यातील शिवा व्हॅली, मिशन शाळा, केडगाव, जयहिंद विद्यालय कासुर्डी , समाजसेवक शिवाजीराव जेधे इंग्रजी माध्यमाची शाळा चौफुला, सेंट सॅबिस्टॅयिन स्कुल, दौंड इ. शाळांनी ही यात सहभाग नोंदविला. यामध्ये १४ वयोगटाखालील, १७ वयोगटाखालील आणि १७ वयोगटापुढील(ओपन ) अशा ३ गटांमध्ये ही स्पर्धा पार पडली.यामध्ये अनुक्रमे ७ नंबर काढण्यात आले. उपस्थित प्रमुख पाहुण्याच्या हस्ते स्पर्धकांना ट्रॉफी आणि प्रशस्तिपत्र देण्यात आले. शाळेच्या वतीने संचालिका आश्लेषा ओनावळे मॅडम व क्रिडा शिक्षिका माधुरी करडे मॅडम यांनी पाहुण्यांचे आभार मानले.