• Home
  • माझा जिल्हा
  • तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत सोमेश्वर विद्यालय आंबीचे यश
Image

तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत सोमेश्वर विद्यालय आंबीचे यश

मोरगाव – प्रतिनिधी

बारामती येथे पार पडलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयाच्या शुभम विकास जाधव याने ८० किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला.

      बारामती तालुक्याच्या शालेय कुस्ती स्पर्धा बारामती येथील कुस्तीगीर संघात पार पडल्या. यावेळी शुभम जाधव याने ८० किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला. त्याची निवड जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी झाली आहे. याच विद्यालयातील शंभूराजे तात्यासाहेब कुतवळ याने ४२ किलो वजन गटात तालुक्यात तृतीय क्रमांक मिळवला.

   यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयातील क्रीडा शिक्षक बाळू बालगुडे, संतोष जेधे यांनी केले. सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष प्रणिता खोमणे, सचिव भारत खोमणे, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस पी होळकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026