निरा, निंबुत येथील जुबीलंट इनग्रेव्हिया कंपनी मध्ये झालेल्या स्फोटा मधील कामगार खरंच सुरक्षित आहेत का?

माझा जिल्हा

संपादक मधुकर बनसोडे.

 दिनांक 2 सप्टेंबर वेळ अंदाजे दुपारी बारा वाजता कंपनी मधील एका प्लांटमध्ये वेल्डिंग चे काम चालू असताना जुबिलंट कंपनीमध्ये स्पोर्ट झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरू लागली. त्यामध्ये अनेक माध्यमाने सांगितले की जवळपास चार कामगार या स्फोटामध्ये जखमी झाले आहेत तर कंपनी प्रशासनाकडून तीन कामगार जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. नक्की किती कामगार या स्फोटामध्ये जखमी झाले आहेत याचा अजून देखील संभ्रमच आहे.

 जे कामगार या स्फोटामध्ये जखमी झाले आहेत ते आता खरंच सुरक्षित आहेत का? त्यांच्या जीवितास काही धोका निर्माण झाला आहे का? अशी चर्चा परिसरातील नागरिकांमधून होत आहे.

 या संदर्भात जुबिलन्ट कंपनीचे जनसंपर्क अधिकारी इसाक मुजावर यांच्याशी संपर्क साधला असता स्फोटात जखमी झालेले सर्व कामगार सुखरूप आहेत असे सांगण्यात येत आहे मात्र स्थानिक नागरिकांमधून एक वेगळ्या चर्चांना आलेलं आहे. या चर्चांवरती पडदा टाकण्यासाठी जनसंपर्क अधिकारी इसाक मुजावर माध्यमांच्या समोर येऊन नागरिकांच्या मनातला संभ्रम दूर करणार का?.

 परिसरातील भयभीत झालेल्या नागरिकांच्या मनामध्ये जी भीती आहे ती भीती काढण्यासाठी सर्व कामगार सुरक्षित असल्याचे जनसंपर्क अधिकारी इसाक मुजावर यांनी माध्यमांना प्रत्यक्ष भेटून बोलावे अशी मागणी डिजिटल मीडिया एक संघाच्या वतीने होत आहे. जनसंपर्क अधिकारी इसाक मुजावर हे नागरिकांना पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतील का?