सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सोमेश्वरनगर या प्रशालेत “शिक्षक दिन” उत्साहात साजरा.*

माझा जिल्हा

सोमेश्वर प्रतिनिधी.

गुरुविना ना मिळे ज्ञान,
ज्ञानाविना ना मिळे सन्मान.
जीवन भवसागर तराया,
चला वंदूया गुरुराया…
शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानाची नवी दृष्टी देऊन समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करतात.तर शिक्षक हे भावी पिढी संस्कारक्षम करण्यासाठी मोलाचे योगदान देतात.
*सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ (विज्ञान) महाविद्यालय सोमेश्वर नगर या प्रशालेत आज ५ सप्टेंबर “शिक्षक दिन” (भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस) साजरा करण्यात आला.*
यानिमित्ताने शिक्षक व विद्यार्थी यांनी *डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन* यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला व त्यांच्या जीवनकार्याचा उल्लेख आपल्या भाषणातून केला.
याप्रसंगी एक दिवसासाठी प्रशालेचे *प्राचार्य* म्हणून कु. तन्वी वाघमारे इयता १०वी क, *उपप्राचार्य* चि. आदित्य सूर्यवंशी इयत्ता १०वी ड, *पर्यवेक्षक* चि. गणेश कोळेकर इयत्ता १०वी ब.यांनी संपूर्ण दिवसभर शालेय कामकाज पाहिले.
याप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य- श्री. प्रमोद जगताप, पर्यवेक्षक- श्रीमती. विजया शिर्के, कार्यालयीन अधीक्षक- श्री.संजय वाबळे सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचा विद्यार्थ्यांनी गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.
इयत्ता १०वी तुकडी अ, ब, क, ड मधील सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडताना संपूर्ण दिवसभर इयत्ता ५वी ते ९वी च्या वर्गावर सर्व विषयांचे अध्यापनाचे कार्य केले.
संपूर्ण दिवसभराचे नियोजन *इयत्ता १०वी चे वर्गशिक्षक* श्री. विजयकुमार शिंदे, श्री. संदीप कदम, श्री. विकास रासकर, श्री. मनोहर धुमाळ यांनी केले.
मा. प्राचार्य श्री जगताप पी .बी. सर यांनी सर्वांना *शिक्षक दिनाच्या शुभेच्छा* दिल्या.